‘पूर्विका’ मोबाईल - देशातील एक उदयोन्मुख रिटेल कंपनी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

‘पूर्विका’ सॅमसंग, ॲपल, नोकिया, सोनी, एचटीसी, मोटोरोला, जिओनी, एलजी अशा अनेक कंपन्यांची सेवा देते. गेली १४ वर्षे ग्राहकांशी नाते जोडत आहे, तसेच विश्‍वासार्हता, ग्राहकांना मैत्रीपूर्ण व्यवहार या जोरावर कंपनीने तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात दोन कोटी ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला.

पुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन, टॅबलेट्‌स तसेच, मोबाईल ॲक्‍सेसरीज, डेटा कार्डस, इअर फोन्स, स्मार्ट वॉच अशा अनेक इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची विक्री करते. या कंपनीचे मुख्य ऑफिस चेन्नईमध्ये आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ३६५ शाखांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे.

मोबाईल विक्रीबरोबरच गॅजेट वापरणाऱ्यांसाठी मल्टिब्रॅंड रिटेलची सेवाही आहे. मोबाईलचा लुक, टच, वापरायला सोपे व आधुनिक पद्धतीचे मोबाईल लोकांसमोर आणण्यासाठी २००४ मध्ये चेन्नईत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उवाराज यांनी ही शो रूम सुरू केली. मोबाईल रिटेलरचे हे जाळे आता नवीन लोगो आणि रंगात नव्या ओळखीने लोकांसमोर आले आहे. ‘पूर्विका’चा नवीन लोगो नारंगी रंग आणि त्यावर मोराचे चिन्ह असा असेल. 

नारंगी रंग हा आनंद आणि सर्जनशीलतेचे प्रतीक मानला जातो. मोर हा राष्ट्रीय पक्षी असून, तो अखंडता दर्शवितो. त्यामुळे सर्वांना सकारात्मक वाटेल अशा पद्धतीने या दोन गोष्टी एकत्र आणून नवीन लोगो तयार करण्यात आला आहे. ‘पूर्विका’ कंपनीकडे योग्य दरांत, योग्य गुणवत्तेचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मोबाईल फोन, गॅजेट्‌स व ॲक्‍सेसरीज उपलब्ध असतील. विक्रीपश्‍चात तत्पर सेवा हे कंपनीचे वैशिष्ट्य असेल व ग्राहकांना काही अडचण आल्यास योग्य सहकार्य केले जाईल. 

‘पूर्विका’ सॅमसंग, ॲपल, नोकिया, सोनी, एचटीसी, मोटोरोला, जिओनी, एलजी अशा अनेक कंपन्यांची सेवा देते. गेली १४ वर्षे ग्राहकांशी नाते जोडत आहे, तसेच विश्‍वासार्हता, ग्राहकांना मैत्रीपूर्ण व्यवहार या जोरावर कंपनीने तमिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात दोन कोटी ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला. यामुळेच प्लेन मॅन मीडियाचा पॉवर ब्रॅंड ग्लॅम्स, व्हॉइस अँड डेटा कनेक्‍टिंग टेलकॉमचा ‘गोल्ड अवॉर्ड’, टाइम्स आयकॉन बेस्ट रिटेलरचा ‘टाइम्स रिटेल आयकॉन’ असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. सर्वाधिक विश्‍वासू आणि ग्राहकांच्या जास्तीत जास्त सोयीचे रिटेलर शो रूम सुरू करण्याचा मानस असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: purvika mobile is an emerging retail company in the country