Fixed Deposit वर मिळवा जबरदस्त रिर्टन, 'या' पाच बँकांचा करा विचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bank
Fixed Deposit वर मिळवा जबरदस्त रिर्टन, 'या' पाच बँकांचा करा विचार

Fixed Deposit वर मिळवा जबरदस्त रिर्टन, 'या' पाच बँकांचा करा विचार

कोरोना काळात सर्वसामान्यांना कळेना की गुंतवणूक कुठे करावी? बँकांमध्ये व्याजदर खूपच कमी मिळत आहे. त्यातून पैशावर चांगला परतावा मिळत नाही. दुसरीकडे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यास घाबरत आहेत. अशा स्थितीत तुम्हाला जर एफडीमध्ये (Fixed Deposit)पैसा गुंतवणूक करु इच्छित असाल तर गॅरंटीसह रिटर्न मिळाले. या ५ बँकांचे एफडी रेट पाहू शकता. पैसे गुंतवणुकीची शक्यता नसल्याने लोक एफडीत गुंतवणूक करण्यास तयार असतात. तर चला जाणून घेऊया जबरदस्त रिटर्न देणाऱ्या पाच बँकांविषयी...

हेही वाचा: Share Market : शेअर बाजारावर मंदिचे सावट!

१.आरबीएल बँक तीन वर्षांच्या एफडीवर देत आहे ६.३० टक्के व्याज. जर तुम्ही ज्येष्ट नागरिक असाल तर तुम्हाला ६.८० टक्के रिटर्न मिळेल. केवळ वर्षभरासाठी गुंतवणूक करत असला तर ६ टक्के व्याज मिळेल.

२.येस बँकेत एका वर्षापर्यंत एफडीवर तुम्हाला ६ टक्के व्याज मिळेल. तीन वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्या एफडी ठेवत असाल तर तुम्हाला ६.२५ टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना ३-१० वर्षांच्या एफडीवर सात टक्क्यांच्या दराने व्याज मिळेल.

३.इंड्सइंड बँक एका वर्षाच्या एफडीवर तुम्हाला ६ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. पाच वर्षांच्या एफडीवरही इंड्सइंड बँकेत गुंतवणुकीवर व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्क्यांच्या दराने व्याज मिळेल.

४.डीसीबी बँक १-३ वर्षांच्या एफडीवर ५.३० ते ५.९५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे. पाच ते दहा वर्षांसाठी बँकेतील एफडीवर ५.९५ टक्के व्याज मिळेल. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.

५. बंधन बँकेत एका वर्षाच्या एफडीवर ५.५० टक्क्यांचे दरात व्याज मिळेल. तुम्ही २-३ वर्षांच्या एफडी ठेवत असाल तर तेव्हाच ५.५० टक्के व्याज दर मिळेल. तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर बँक २-३ वर्षांच्या एफडीवर ६.२५ टक्के व्याज मिळेल.

loading image
go to top