Share Market : शेअर बाजारावर मंदिचे सावट! आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Share Market

दिग्गजांसह लघु-मध्यम शेअर्समध्येही कमजोरी दिसून आली.

Share Market : शेअर बाजारावर मंदिचे सावट!

sakal_logo
By
शिल्पा गुजर

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारावर कमजोरीचे वर्चस्व राहिले आणि सेन्सेक्स-निफ्टी खाली घसरले. गुरुवारी सेन्सेक्स 433.13 अंकांनी अर्थात 0.72 टक्क्यांनी घसरून 59,919.69 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 143.60 अंकांनी अर्थात 0.80 टक्क्यांनी घसरून 17,873.60 वर बंद झाला.

दिग्गजांसह लघु-मध्यम शेअर्समध्येही कमजोरी दिसून आली. बीएसईचे मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांकही जवळपास अर्ध्या टक्क्याने घसरले. आयओसी, टेक महिंद्रा, एसबीआय, ओएनजीसी आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले तर टायटन कंपनी, हिंदाल्को इंडस्ट्रीज जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

हेही वाचा: Veranda Learning कडून 200 कोटींच्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर

share market

share market

वेगवेगळ्या क्षेत्रांवर नजर टाकल्यास निफ्टी बँक, फार्मा, ऑटो आणि पीएसयू बँक 1 टक्क्यांहून अधिक घसरले. तर मेटल क्षेत्रात तेजी दिसून आली.

तांत्रिक दृष्टिकोन

निफ्टीने डेली स्केलवर बियरिश कँडल तयार केली आहे. निफ्टीला 18,100-18,150 च्या झोनमध्ये जाण्यासाठी 17950 च्या वरच राहावे लागेल असे मोतीलाल ओसवालचे चंदन तापडिया म्हणाले. तर खाली निफ्टीला 17,777 आणि 17,600 वर सपोर्ट असल्याचे ते म्हणाले. निफ्टीने 17800 च्या सपोर्टचा आदर केल्याचे दिनदयाल इन्व्हेस्टमेंटचे मनीष हथिरामानी म्हणाले. आता निफ्टी 17700 ची पातळी तोडतो की 18100 च्या वर जातो हे पाहावे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा: नोव्हेंबरमध्ये आणखी एका दिग्गज कंपनीचा IPO, कमाईची संधी!

Share Market

Share Market

आज कोणत्या शेअर्सवर नजर ठेवाल?

- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBIN)

- ओएनजीसी (ONGC)

- एसबीआय लाईफ (SBILIFE)

- बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSEV)

- टेक महिन्द्रा (TECHM)

- बालकृष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)

- भारत फोर्ज (BHARATFORG)

- आयडिया (IDEA)

- बँक ऑफ इंडिया (BANKINDIA)

- गोदरेज प्रॉपर्टींज (GODREJPROP)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top