म्युच्युअल फंडाची गंगाजळी 25.51 लाख कोटींवर !

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

मुंबई: देशातील म्युच्युअल फंडातील सरासरी एकूण गुंतवणूक पहिल्या तिमाहीअखेर (एप्रिल ते जून) 25.51 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या (2018-19) चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) या कालावधीत 24.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. जून महिन्यात म्युच्युअल फंडांमधील 1.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढूनसुद्धा घेण्यात आली आहे. त्याउलट मे महिन्यात 76,990 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.

मुंबई: देशातील म्युच्युअल फंडातील सरासरी एकूण गुंतवणूक पहिल्या तिमाहीअखेर (एप्रिल ते जून) 25.51 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या (2018-19) चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) या कालावधीत 24.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. अॅम्फीने यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. जून महिन्यात म्युच्युअल फंडांमधील 1.6 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक काढूनसुद्धा घेण्यात आली आहे. त्याउलट मे महिन्यात 76,990 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. जून महिन्यात डेट आणि इन्कम प्रकारातील गुंतवणूक काढून घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल होता तर मे महिन्यात याच फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी रस दाखवला होता. 

म्युच्युअल फंड कंपन्यांकडून या कालावधीत आगाऊ कर भरण्याच्या प्रक्रियेला प्राधान्य दिले जाते त्याचाही परिणाम गुंतवणूक काढून घेण्यावर झाला आहे. अॅम्फीने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 24.25 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. मे महिन्यात एकूण गुंतवणूक 25.94 लाख कोटी रुपये होती. तर जून 2018 मध्ये म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक 22.86 लाख कोटी रुपये होती. ईएलएसएस, लार्जकॅप, मल्टीकॅप, सेक्टोरल आणि थेमॅटीक, मिडकॅप या प्रकारात सर्वाधिक म्हणजे एकूण फोलिओंच्या 50.1 टक्के गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूकदार इक्विटी प्रकारातील म्युच्युअल फंडांनाच प्राधान्य देताना दिसत आहेत. 

मार्च महिन्यात गुंतवणूकदारांनी 22,357 कोटी रुपयांची गुंतवणूक तर फेब्रुवारी महिन्यात 20,083 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात लिक्विड फंड किंवा मनी मार्केट प्रकारातून काढली जाणारी गुंतवणूक दुप्पट झाली होती. फेब्रुवारी महिन्यात 51,343 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. तर इन्कम फंडांमधून फेब्रुवारी महिन्यात 4,214 कोटी रुपये आणि मार्च महिन्यात 11,756 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेण्यात आली होती. इक्विटी (ईएलएसएस), बॅलन्स्ड आणि इतर ईटीएफ प्रकारातील एकूण गुंतवणूक मार्चअखेर 9.05 टक्क्यांची वाढ होत 11.55 लाख कोटींवर पोचली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarterly AUM of mutual fund industry at Rs 25.51 lakh crore at Q1-end