सरकार रेल्वेची महागडी जमीन प्रायवेट कंपनीला देणार; ऑनलाईन लिलाव सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 December 2020

दिल्लीमधील मेट्रो आणि कश्मीरी गेटला लागून असलेल्या रेल्वे कॉलोनीची अमूल्य जमीन केंद्र सरकार आता प्रायवेट कंपनीला भाडेतत्वावर देण्याची तयारी केली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीमधील मेट्रो आणि कश्मीरी गेटला लागून असलेल्या रेल्वे कॉलोनीची अमूल्य जमीन केंद्र सरकार आता प्रायवेट कंपनीला भाडेतत्वावर देण्याची तयारी केली आहे. सरकारने यासाठी ऑनलाईन बोली सुरु केली आहे. ऑनलाईन लिलावाची शेवटची तारीख 27 जानेवारी आहे. ही जमीन जवळजवळ 21800 चौ.मी. आहे. मध्य दिल्लीतील ही सर्वात अमूल्य जमीन असल्याचे मानले जाते. सध्या याची 396 कोटी रुपये रिझर्व्ह प्राईझ ठेवण्यात आली आहे. 

या जमिनीवर PPP मॉडेल अंतर्गत पाच वर्षात कॉलोनीसह मॉल आणि दुकाने बनवली जाणार आहेत. रेल्वेच्या रिकाम्या पडलेल्या जमिनीच्या विकासासाठी रेल्वे भूमी विकास प्राधिकरण म्हणजे Rail Land Development Authority बनवण्यात आली होती, जी देशातील 84 रेल्वे कॉलोनीच्या विकासाची जबाबदारी घेते. RLDA चे उपाध्यक्ष वेदप्रकाश डुडेजा यांनी सांगितलं की नवी दिल्ली, मोमती नगर, देहरादून सह अनेक शहरातील रेल्वेच्या जमिनीच्या विकासाचे काम सुरु आहे. 

ममतांच्या राज्यात राष्ट्रपती राजवट? राज्यपालांनी दिले संकेत

मागील महिन्यात रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाने वाराणसी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत वसुंधरा लोको रेल्वे कॉलोनीच्या पूनर्विकासासाठी ऑनलाईन लिलाव करण्याचे ठरवले होते. या योजनेअंतर्गत एकूण जमीन 2.5 हेक्टर ठरवण्यात आली, ज्यातील 1.5 हेक्टरमध्ये रेल्वे कमर्शियल विकसित करण्याची योजना आहे. RLDA ने या योजनेसाठी भाडेतत्वाचा कालावधी 45 वर्ष ठरवला आहे, ज्याची रिझर्व प्राईझ केवळ 24 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rail Land Development Authority government invited online bids lease of railway colonys