Railway Budget 2022 News Updates : अर्थमंत्री रेल्वे प्रवासी भाड्याबाबत काय घोषणा करणार? | Railway Budget 2022 News Updates Covid pandemic hit Indian railways new passenger fare in Union Budget 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Budget 2022 News Updates
Union Budget 2022: अर्थमंत्री रेल्वे प्रवासी भाड्याबाबत काय घोषणा करणार?

Railway Budget 2022: अर्थमंत्री रेल्वे प्रवासी भाड्याबाबत काय घोषणा करणार?

Railway Budget 2022-23 Live Updates: देशातील दळणवळणाचा सर्वात मोठा भार हा भारतीय रेल्वे आपल्या खांद्यावर वाहत असते. त्यामुळेच २०१७ पर्यंत रेल्वेचे विशेष बजेट (Railway Budget) सादर केले जायचे. मात्र २०१७ पासून रेल्वेचे बजेट मुख्य बेजटमध्येच समाविष्ट करण्यात आले. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Union Budget 2022) आज संसदेत २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे बजेट सादर करणार आहेत. कोरोनाचा मोठा फटका हा भारतीय रेल्वेला बसला आहे. त्यामुळे यंदा अर्थमंत्री रेल्वेसाठी काय घोषणा केली जाते याचा आढावा घेणे गरजेचे आहे. (Railway Budget 2022 News Updates)

हेही वाचा: Budget 2022 Live: कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार - निर्मला सीतारामन

गेल्या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारतीय रेल्वेसाठी (Indian railways) १.१० लाख कोटी रूपये दिले होते. त्यातील तब्बल १.०७ लाख कोटी रूपये हे पायाभूत सुविधांसाठी (Capital Expenditure) खर्च केले जाणार होते. काही जाणकारांच्या मते यंदा रेल्वेसाठी बजेटमख्ये १० चे १२ लाख कोटी रूपये देण्याची घोषणा होऊ शकते. अर्थातच ही रक्काम ८ ते १० वर्षाच्या दीर्घ प्लॅनसाठी असू शकते.

हेही वाचा: हॉटेल व्यावसायिकांना दिलासा! गॅस सिलिंडर ९१ रुपयांनी स्वस्त

कोरोना महामारीमुळे (Covid pandemic) गेली दोन वर्षे भारतीय रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आताकुठे भारतीय रेल्वे रूळावर येत आहे. मात्र कोरोना काळातील आर्थिक फटका भरून काढण्यासाठी प्रवाशी भाड्यांबाबत काही निर्णय होऊ शकतो. हा रेल्वे बजेट २०२२ (Rail Budget 2022) चा सर्वात मोठा मुद्दा असणार आहे. याचबरोबर सेमी हाय स्पीड रेल्वेच्या काही घोषणा होणार का याबाबतही सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा: Budget 2022 : ब्रीफकेस ते मोबाईल App, असा आहे बजेटचा प्रवास

Web Title: Railway Budget 2022 News Updates Covid Pandemic Hit Indian Railways New Passenger Fare In Union Budget 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top