निवडणूक निकालांचा काय परिणाम होईल?  

राजेंद्र सूर्यवंशी
सोमवार, 10 डिसेंबर 2018

चालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले संकेत नाहीत. अमेरिकी व युरोपीय शेअर बाजार नीचांकी पातळीवर आहेत. चीन- अमेरिका यांच्यातील व्यापारवाद संपविण्यासाठी दोन्ही देशांनी पुढील तीन महिने नवे आयात शुल्क लावू नये, असे ठरले असले, तरी अमेरिकी अध्यक्षांचा स्वभाव पाहता बाजाराला यावर फार विश्वास नाही. कच्च्या तेलाचे भाव पुन्हा भडकण्याची शक्‍यता असून, या सर्व बाबी बाजारावर दबाव वाढवीत आहेत.

चालू आठवडा शेअर बाजारासाठी महत्त्वाचा असून, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल आपल्या शेअर बाजाराची दिशा ठरविणारे असतील. जागतिक पातळीवरून अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले संकेत नाहीत. अमेरिकी व युरोपीय शेअर बाजार नीचांकी पातळीवर आहेत. चीन- अमेरिका यांच्यातील व्यापारवाद संपविण्यासाठी दोन्ही देशांनी पुढील तीन महिने नवे आयात शुल्क लावू नये, असे ठरले असले, तरी अमेरिकी अध्यक्षांचा स्वभाव पाहता बाजाराला यावर फार विश्वास नाही. कच्च्या तेलाचे भाव पुन्हा भडकण्याची शक्‍यता असून, या सर्व बाबी बाजारावर दबाव वाढवीत आहेत. परंतु, आपल्या बाजारासाठी पाच राज्यांतील निवडणुकीचे निकाल हे २०१९ मधील लोकसभा निवडणूक निकालाची दिशा व कोणते सरकार सत्तेत येईल, याचा अंदाज देणारे असणार आहेत. स्थिर व विकासाभिमुख सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाजाराची पहिली पसंती असल्याने त्यांच्या बाजूने येणारे संकेत बाजाराला वाढीची दिशा देतील आणि विरोधातील संकेत बाजाराला मोठ्या घसरणीकडे ढकलतील. 
विविध माध्यमांनी घेतलेल्या मतदानोत्तर कलचाचण्यांचे अंदाज तरी भाजपच्या बाजूने फारसे दिसत नाहीत, त्यामुळे उद्या (मंगळवारी) प्रत्यक्ष काय होते, याकडे बाजाराचे आणि तमाम गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे, हे निश्‍चित!

राजेंद्र सूर्यवंशी (संशोधक विश्‍लेषक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajendra suryavanshi article election results affect the stock market