आर्थिक प्रतिकारशक्ती मजबूत हवी!

रवी कृष्णमूर्ती
Monday, 2 November 2020

आज ग्राहक शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत आहेत आणि म्हणूनच त्यांची प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या उत्पादनांवर खर्च करण्याची तयारीही आहे. 

इतिहासातील सर्वांत मोठ्या महासाथीला आपण सर्वच जण तोंड देत असून, मानवजातीवर आलेल्या या अभूतपूर्व संकटामुळे लोकांमध्ये काळजी व तणाव वाढला आहे. या संकटाने आरोग्य आणि जीवनाकडे बघण्याच्या ग्राहकांच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल होत असल्याचे दिसून येत आहे. आज ग्राहक शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत आहेत आणि म्हणूनच त्यांची प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या उत्पादनांवर खर्च करण्याची तयारीही आहे. 

शारीरिक प्रतिकारशक्तीची अशाप्रकारे काळजी घेतली जात असताना, आर्थिक प्रतिकारशक्तीदेखील मजबूत करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे गरजेचे नाही का?

आणखी बातम्या व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या महासाथीमुळे आपली शारीरिक सुरक्षा जशी धोक्यात आली, तशीच आर्थिक सुरक्षाही धोक्यात आली आहे. व्यवसायांवर झालेला परिणाम आणि वाढलेली बेरोजगारी ही आपल्या सर्वांसाठीच धोक्याची घंटा आहे, विशेषत-ज्यांनी यापूर्वी आर्थिक प्रतिकारशक्ती वाढविण्याचा पर्याय गृहीत धरला नव्हता, त्यांच्यासाठी! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोविडचे रूग्ण वाढत असतानाच लोकांनी अशा कठीण काळात सुरक्षित राहण्यासाठी आपल्या आर्थिक पोर्टफोलिओचे पुनरावलोकन सुरू करायला हवे. काळाची पावले ओळखून आपल्या कुटुंबियांना शारीरिक, भावनिक आणि आर्थिक स्तरावर सुरक्षित ठेवण्याचे मार्ग शोधायला पाहिजेत. 

आरोग्य व जीवनाशी संबंधित प्रतिकारशक्ती उभारण्यासाठी हे लक्षात ठेवा...
बदल स्वीकारून कृती हवी -आपण बदलती आर्थिक जीवनशैली स्वीकारली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलली पाहिजेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक पोर्टफोलिओची उभारणी - आर्थिक पोर्टफोलिओ मजबूत करणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वसमावेशक आरोग्य विमा असणे आवश्यक आहे. यामुळे जीवनातील उद्दिष्टे साकार करण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू होतो व अवघड काळात स्वतःसाठी आणि कुटुबियांसाठी सुरक्षा मिळते. 

क्रिटिकल इलनेस कव्हरची जोड - भारतातील तीनपैकी एक जण जीवनशैलीविषयक गंभीर आजाराचा बळी ठरत आहे. इन-बिल्ट क्रिटिकल इलनेस कव्हरसह आयुर्विमा घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे आरोग्याशी निगडीत अनिश्चिततेच्या काळात उपयोग होईल. 
कुटुंबाला आर्थिक पोर्टफोलिओची माहिती -भारतातील ४३ टक्के महिलांना त्यांच्या पतीच्या आर्थिक बाबींची माहिती नसते. कोणतीही दुर्देवी घटना घडल्यास कुटुंबाला तुमच्या आर्थिक बाबींची माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबाला विमा योजना, बँक खात्याचे तपशील, म्युच्युअल फंड्स आणि इतर गुंतवणुकींची माहिती देऊन ठेवा. 

सध्याच्या परिस्थितीत आपल्या जीवनशैलीमध्ये मोठे बदल करण्याची गरज आहे, ज्यामुळे आपल्याला स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पातळीवर संरक्षण होईल. आपण शारीरिक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काम करीतच आहोत, त्याबरोबर आर्थिक प्रतिकारशक्ती बळकट करून आपले आणि आपल्या कुटुंबाचे आजच्या अनिश्चिततेच्या काळात रक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. 

(लेखक एसबीआय लाइफ इन्शुरन्स-झोन १ चे अध्यक्ष आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi krushanamutri writes article about Economic protection