
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये रायपूर येथील व्यावसायिक सहकारी बॅंक मर्यादित आणि लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा समावेश आहे. या बँकांनी ‘केवायसी’च्या नियमांचे उल्लंघन केले होते.
नवी दिल्ली - नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यामध्ये रायपूर येथील व्यावसायिक सहकारी बॅंक मर्यादित आणि लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा समावेश आहे. या बँकांनी ‘केवायसी’च्या नियमांचे उल्लंघन केले होते.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या प्रकरणी रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक सहकारी बँक मर्यादित या सहकारी बँकेला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे, तर महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेला दोन लाखांचा दंड केला आहे. दरम्यान, दोन्ही सहकारी बँकांवरील कारवाई ही काही उणीवा आढळून आल्याने करण्यात आली आहे. याचा ग्राहकांच्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
गुगलमध्येही वाहू लागले कामगार ऐक्याचे वारे
Edited By - Prashant Patil