आदित्य पुरींचा उत्तराधिकारी मिळाला; शशिधर जगदिश होणार HDFC नवे CEO

सुशांत जाधव
Tuesday, 4 August 2020

एचडीएफसी बँकेने याच वर्षी पुरी यांच्या संभावित उत्तराधिकाऱ्यांची यादी रिझर्व्ह बँकेकडे सुपर्द केली होती.

मुंबई : देशातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या एचडीएफसी बँकच्या नव्या प्रमुखाच्या (सीईओ) नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आदित्य पुरी यांच्या जागेवर आता शशिधर जगदिशन विराजमान होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या नावाला मंजूरी दिली आहे. सध्याच्या घडीला जगदिशन एचडीएफसी या खासगी क्षेत्रीतील सर्वात मोठ्या बँकेत 'चेंज एजेंट' आणि वित्त विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 1996 पासून ते एचडीएफसीमध्ये कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून बँकिग क्षेत्रात पुरी यांचा उत्तराधिकारी कोण? याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.  पुरी 20 ऑक्टोबर रोजी सेवा निवृत्त होणार आहेत. त्यानंतर शशिधर जगदिशन त्यांची जागा घेतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील 25 वर्षांच्या काळात पुरी यांनी एचडीएफसी बँकेला एका विशिष्ट उंचीवर आणून ठेवले आहे. संपत्तीच्या बाबतीत एचडीएफसी बँकेला दुसऱ्या क्रमांकावर आणण्याचे श्रेय पुरी यांना जाते. ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे पदोन्नतीनुसार काहींची यादी रिझर्व्ह बँकेला देण्यात आली होती. यातील  जगदीशन यांच्या नावाला मंजूरी मिळाली आहे. 

मुक्त व्यापार करार उभयपक्षी लाभाचा

एचडीएफसी बँकेने याच वर्षी पुरी यांच्या संभावित उत्तराधिकाऱ्यांची यादी रिझर्व्ह बँकेकडे सुपर्द केली होती. शशिधर जगगदीशन यांच्याशिवाय कैजाद भडचा आणि सिटी बँकेचे सुनील गर्ग यांच्या नावाचा समावेश होता. पुरी यांनी मागील सर्वसाधारण सभेत शेअरधारकांना लवकरात लवकर उत्तराधिकारी मिळेल, असा भरवसा दिला होता.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rbi approves sashidhar jagdishans name for ceo of hdfc bank After aditya puri