आता पेटीएममध्ये नवीन खाते उघडता येणार नाही

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई: पेटीएमच्या डिजिटल पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. पेटीएम डिजिटल पेमेंट बँकेत आणि ई वॉलेटवर नवीन खाती सुरु करण्यास ऑगस्ट महिन्यापासून निर्बंध लादण्यात आले आहेत. पेटीएमने खातेदारांच्या केवायसीसंबंधी (नो यूवर कस्टमर) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. 

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या पेमेंट बँकेसंबंधित नियमांचे पेटीएमकडून उल्लंघन करण्यात आले आहे. पेमेंट बँकेत एका खात्यात  जास्तीत जास्त एक लाखांची रक्कम ठेवता येते. बँकेला शंभर कोटी रुपयांचे नेटवर्थ राखणे देखील गरजेचे आहे. शिवाय पेटीएमचे प्रवर्तक विजयशेखर शर्मा यांचा बँकेतील हिस्सा 51 टक्क्यांवर पोचला आहे. तर इतर भांडवल इतर काही कंपन्या आणि  97 कम्युनिकेशन्सकडे आहे. मात्र त्यात देखील शर्मा यांची हिस्सेदारी असल्याने अप्रत्यक्षरीत्या बँकेतील त्यांच्या हिस्सा अधिक आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI blocked Paytm bank’s new business