उर्जित पटेलांनंतर 'रिझर्व्ह बँके'च्या डेप्युटी गव्हर्नरचाही राजीनामा?

वृत्तसंस्था
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून सांगण्यात आले आहे. 

गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मोदी सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. आचार्य यांनी मुंबईतील एका व्याख्यानमालेत अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, या शब्दात मोदी सरकारवर बोचरी टीका केली होती. आचार्य यांनी  देखील सरकारची आणि मुख्यतः देशाचे अर्थमंत्री अरुज जेटली यांची नाराजी ओढवून घेतली होती. 

उर्जित पटेल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वैयक्तिक कारणामुळे मी सध्याच्या पदावरून तत्काळ पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात मी आरबीआयची सेवा करू शकलो, हे मी माझे भाग्य समजतो. आरबीआयमधील कर्मचाऱ्यांनी माझ्या कार्यकाळात खूप मदत केली. माझ्या सहकाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा.

कोण आहेत विरल आचार्य?
रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या जागी डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य यांची निवड करण्यात आली होती. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसच्या अर्थ विभागात ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते.  42 वर्षांचे विरल यांनी मुंबईच्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थेतून (आयआयटी)  संगणक अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. तसेच न्यूयॉर्क विद्यापीठातून त्यांनी अर्थ विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. लंडन स्कूल ऑफ बिझनेस, कोलर इन्स्टिटय़ूट, बँक ऑफ इंग्लंड येथेही त्यांनी काम केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI deputy governor Viral Acharya has resigned?