झिरो बॅलन्स खातेदारांना चेकबुकची सुविधा 

पीटीआय
मंगळवार, 11 जून 2019

मुंबई:  वित्तीय समावेशनाच्यादृष्टीने बॅंकेत सुरू करण्यात आलेल्या बेसिक सेव्हिंग बॅंक डिपॉझिट अकाउंट असलेल्या ग्राहकांना चेकबुक आणि एटीएम कार्ड नि:शुल्क देण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी (ता. 10) दिले. बेसिक सेव्हिंग बॅंक डिपॉझिट अकाउंट (बीएसबीडी) संदर्भातील नियमावली "आरबीआय'ने शिथिल केली आहे. 
 
 खात्यांना किमान शिलकीची अट नसल्याने बॅंकांकडून त्यावर कोणतीही सुविधा देण्यात येत नव्हती. मात्र, यापुढे बचत खातेदारांप्रमाणे बेसिक सेव्हिंग बॅंक डिपॉझिट अकाउंट असलेल्या ग्राहकांना चेकबुक आणि इतर सुविधा कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना आणि किमान शिलकीच्या अटीविना उपलब्ध कराव्यात, असे निर्देश "आरबीआय'ने बॅंकांना दिले आहेत. यामुळे ग्राहकांना चेकबुक, एटीएम कम डेबिट कार्ड निःशुल्क उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना बॅंक खात्यात रोख भरण्याची सुविधा मिळेल. या सुविधा देताना बॅंकांना किमान शिलकीची अट लागू करू नये, असे "आरबीआय'ने स्पष्ट केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI eases norms for no-balance accounts