आयएल अॅंड एफएसच्या संकटासाठी रिझर्व्ह बॅंकच जबाबदार: अरविंद सुब्रमण्यन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आयएल अॅंड एफएसच्या आर्थिक अरिष्टासाठी रिझर्व्ह बॅंकच जबाबदार असल्याचे मत माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी व्यक्त केले आहे. ज्या कंपन्यांचे नियमन आरबीआय करते आहे त्यांच्याशी संबंधित अरिष्टांसाठी आरबीआयलाच जबाबदार धरले पाहिजे असेही ते म्हणाले. लवकरच सुब्रमण्यन यांचे 'ऑफ कौन्सेल : द चॅलेन्जेस ऑफ द मोदी-जेटली इकॉनॉमी' हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

यात त्यांनी सद्य सरकारच्या आर्थिक धोरणांचा आढावा घेतला आहे. 'आरबीआयला खूप प्रतिष्ठा आहे, याचा अर्थ आरबीआय नेहमी योग्यच असेल असे नाही. कित्येक वर्ष थकित कर्जांच्या वसूलीसंदर्भात किंवा नीरव मोदीसारख्या प्रकरणांचा छटा लावण्यात आरबीआयला अपयशच आले आहे. आरबीआय या संदर्भात पुरेशी गंभीर नव्हती. आर्थिक बाबींचे नियमन करताना आरबीआयने धडाडी दाखवली पाहिजे', असेही मत सुब्रमण्यन यांनी व्यक्त केले आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी मुंबईत तर 9 डिसेंबर रोजी दिल्लीत सुब्रमण्यन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आहे. 

अरविंद सुब्रमण्यन यांनी 2018 चा आर्थिक पाहणी अहवाल तयार केला होता. त्यात त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या अतिरिक्त मालमत्तेचा, त्यातील परकी चलन आणि 9.7 ट्रिलियन रुपयांच्या निधीचा आणखी उत्पादक बाबींसाठी वापर झाला पाहिजे असे मत मांडले होते. अरविंद सुब्रमण्यन ऑक्टोबर 2014 ते जून 2018 या कालावधीत मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यानंतर वैयक्तिक कारणास्तव ते पदावरून पायउतार झाले आणि अमेरिकेत परतले होते. 2017 मध्ये त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Extra Capital Should Be Used For State-Run Banks: Arvind Subramanian