सरकार-रिझव्‍‌र्ह बँकेतील वाद टोकाला; उर्जित पटेल राजीनामा देणार?

वृत्तसंस्था
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

मुंबई: केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्या दरम्यान वाद वाढत चालला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देण्याची शकयता असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या प्रश्नावरून केंद्र आणि रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यान वाद निर्माण झाला आहे. 

मुंबई: केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्या दरम्यान वाद वाढत चालला असून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल हे राजीनामा देण्याची शकयता असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेच्या प्रश्नावरून केंद्र आणि रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यान वाद निर्माण झाला आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेच्या धोरणावर काही प्रश्न उपस्थित केले. रिझर्व्ह बँकेने मोदी सरकार सत्तेत येण्याआधी म्हणजेच २००८ ते २०१४ दरम्यान बँकांकडून झालेल्या अनिर्बंध कर्जवाटपाला नियंत्रित करण्यात मध्यवर्ती बँकेची भूमिका अपयशी ठरली असल्याचे मत जेटलींनी व्यक्त केले. परिणामी वाढत्या एनपीएसाठी त्यांनी रिझर्व्ह बँकेला जबाबदार धरले आहे. शिवाय गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबई  ए.डी. श्रॉफ या व्याख्यानमालेत रिझर्व्ह बँक नेहमी दीर्घकालीन विचार करून पाऊले उचलत असल्याचे सांगितले होते. परिणामी केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यानचा वाद सर्वांसमोर आला आहे. 

केंद्र सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेदरम्यानच्या वादामुळे आता पटेल राजीनामा देणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. मात्र पटेल यांनी राजीनामा दिल्यास मोदी सरकार पुढील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता पटेल यांच्या राजीनाम्याबाबतीत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी सरकारच्या भूमिकेमुळे पटेल नाराज असून राजीनाम्यासह सर्व पर्याय खुले ठेवल्याचे वृत्त दिले आहे. तर काही वृत्तपत्रांनी पटेल  राजीनामा देणार नाही, असे म्हटले आहे. मात्र या सर्व घडामोडींवर अद्याप रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Governor Urjit Patel May Resign Reports Say