उर्जित पटेलांचा राजीनामा; दिले वैयक्तिक कारण

वृत्तसंस्था
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी एकाएकी राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र गेल्याकाही दिवसांपासून स्वायत्ततेच्या मुद्द्यावरुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारमध्ये तणाव निर्माण झाला होता. उर्जित पटेल हे गव्हर्नरपदाचा राजीनामा देणार याची चर्चा आधीपासूनच सुरु होती.

गेल्या काही दिवसांपासून रिझर्व्ह बँक आणि मोदी सरकारमधील संबंध विकोपाला गेले होते. रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीतून मोठा हिस्सा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न तसेच बँकांच्या कर्ज वितरणावर आणलेले निर्बंध दूर करावेत यासाठी सरकारचा रिझर्व्ह बँकेवर दबाव असल्याचे बोलले जात होते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी मुंबईतील एका व्याख्यानमालेत अर्थव्यवस्थेबाबत मध्यवर्ती बँक कायम दीर्घकालीन विचार करते, या शब्दात मोदी सरकारवर बोचरी टीका केली होती. 

उर्जित पटेल यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वैयक्तिक कारणामुळे मी सध्याच्या पदावरून तत्काळ पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात मी आरबीआयची सेवा करू शकलो, हे मी माझे भाग्य समजतो. आरबीआयमधील कर्मचाऱ्यांनी माझ्या कार्यकाळात खूप मदत केली. माझ्या सहकाऱ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Governor Urjit Patel resigns citing 'personal reasons'