सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेचे नाते पती-पत्नीसारखे : मनमोहन सिंग

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेतील तणावाच्या संबंधावर भाष्य केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील नाते हे पती-पत्नीच्या नात्यासारखेच असते. दोन्ही संस्थांनी आपसातील मतभेद हे सौहार्दाने मिटवायचे असतात, असे मत मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाच अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेतील तणाव वाढल्यानंतर उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मनमोहन सिंगांची 'चेंजिंग इंडिया' या शीर्षकाने सहा खंडांची पुस्तक मालिका लवकरच प्रकाशित होते आहे. स्वत: मनमोहन सिंग हे सुद्धा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर होते. रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्ततेचा सन्मान सरकारने केला पाहिजे. जो कोणी रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर असेल त्याला माझ्या नेहमीच शूभेच्छा असतील. सरकार आणि रिझर्व्ह मतभेद मिटवून एकत्र येऊन काम करतील अशी मला आशा आहे, असेही मनमोहन सिंग पुढे म्हणाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI-govt relationship like husband-wife, says Manmohan Singh