esakal | मास्टरकार्डला दणका; रिझर्व्ह बँकेनं केली कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

पेमेंट सिस्टिम डेटाच्या स्थानिक स्टोरेज नियमांचे पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

मास्टरकार्डला दणका; रिझर्व्ह बँकेनं केली कारवाई

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेनं बुधवारी मास्टराकार्ड विरोधात मोठी कारवाई केली आहे. मास्टरकार्ड आशिया/पॅसिफिक लिमिटेडवर कारवाईमध्ये 22 जुलै 2021 पासून त्यांच्या कार्ड नेटवर्कमध्ये नवीन घरेलू ग्राहकांचा समावेश करता येणार नसल्याचं म्हटलं आहे. नवीन ग्राहक जोडण्यावर आरबीआयने बंधन घातलं आहे.

पेमेंट सिस्टिम डेटाच्या स्थानिक स्टोरेज नियमांचे पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेनं म्हटलं की, अधिक वेळ आणि पुरेशी संधी दिल्यानंतरही मास्टरकार्डने पेमेंट सिस्टिमच्या नियमावलीचं पालन केलं नाही. रिझर्व्ह बँकेच्या या आदेशाचा सध्या कार्ड वापरत असलेल्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

कार्ड देणाऱ्या सर्व बँका आणि इतर संस्थांना या आदेशाची माहिती द्यावी असेही निर्देश रिझर्व्ह बँकेनं मास्टरकार्डला दिले आहेत. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टिम अॅक्ट 2007 च्या कलम 17 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मास्टरकार्डला पीएसएस कायद्यांतर्गत देशात कार्ड नेटवर्क चालवण्यासाठी पेमेंट सिस्टिम ऑपरेटर म्हणून मंजुरी दिली आहे.

loading image