RBI : कर्जदारांना आज झटका बसण्याची शक्यता; रेपो दरात होणार वाढ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

RBI : कर्जदारांना आज झटका बसण्याची शक्यता; रेपो दरात होणार वाढ?

RBI MPC Meeting : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आज रेपो दराता 0.35 ते 0.50 टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. याचा फटका कर्जदारांना बसणार असून, यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे EMI वाढण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येऊन त्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. आरबीआयच्या आजच्या निर्णयापूर्वी 4 बँकांसह कर्ज देणाऱ्या संस्थांनी गेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ केली होती.

हेही वाचा: बँकॉक येथ नाईट क्लबमध्ये अग्नीतांडव; 13 जणांचा मृत्यू, 35 जखमी

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. सध्या देशात रेपो दर 4.90 टक्के आहे आणि तो 0.50 टक्क्यांनी वाढवून 5.40 टक्क्यांवर आणला जाऊ शकतो. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत कोणते निर्णय होतील, हे आज सकाळी 10 वाजेनंतर कळेल, मात्र आरबीआयने दर वाढवल्यास त्याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार हे स्पष्ट आहे. याआधी मे महिन्यात आरबीआयने रेपो दरात 0.40 टक्के आणि जूनमध्ये 0.50 टक्के वाढ केली होती.

हेही वाचा: Maharashtra Weather : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण, या भागात मुसळधार पावसाची शक्यता

'रेपो रेट' आणि 'रिव्हर्स रेपो रेट' म्हणजे काय?

रिझर्व्ह बँक देशातील बँकांना कर्ज उपलब्ध करून देत असते. या कर्जावरील व्याजदराला रेपो दर म्हणतात. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो तो रेपो रेट असतो. बँकांना रिझर्व्ह बँकेला ही कर्जाची रक्कम या रेपो दरानं व्याजासह परत द्यावी लागते.

रिव्हर्स रेपो दर म्हणजे बँकांना त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेव स्वरुपात ठेवलेल्या रकमेवर व्याज मिळते. त्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

Web Title: Rbi May Increase Repo Rate By 050 Percent Today Loan Installment Will Increase

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..