esakal | Breaking:आरबीआयचं पतधोरण जाहीर; कर्जाच्या व्याज दरांवर परिणाम नाही 
sakal

बोलून बातमी शोधा

rbi monetary policy august 2020 repo rate unchanged

ध्या रेपो रेट 4 टक्क्यांवर आहे तर, रिव्हर्स रेपो रेट 3.3 टक्क्यांवर आहे. परिणामी कर्जाच्या व्याजदरांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट झालंय. 

Breaking:आरबीआयचं पतधोरण जाहीर; कर्जाच्या व्याज दरांवर परिणाम नाही 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून आज तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती त्यात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कायम ठेवण्यात आला आहे. सध्या रेपो रेट 4 टक्क्यांवर आहे तर, रिव्हर्स रेपो रेट 3.3 टक्क्यांवर आहे. परिणामी कर्जाच्या व्याजदरांवर कोणताही परिणाम होणार नाही, हे स्पष्ट झालंय. आरबीआयच्या पतधोरण समितीची तीन दिवस बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाचा जीडीपी रेट खालीच राहण्याची शक्यता आहे, असं दास यांनी स्पष्ट केलंय. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले गव्हर्नर?

  • जगभरातील आयात-निर्यातीवर कोरोनाचा परिणाम 
  • भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे.
  • लॉकडाउनच्या काळात एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्थेत सुधारणा
  • कोरोनावर लस आल्यानंतर, अर्थव्यवस्थेचं चित्र बदलू शकतं 
  • भारताचा आर्थिक विकास दर, उणेच राहण्याची शक्यता