RBI कडून लवकरच UPI आधारित पेमेंट व्यवस्था! | Shaktikant Das

RBI कडून लवकरच UPI आधारित पेमेंट व्यवस्था! | Shaktikant Das

रिझर्व्ह बँकेने (RBI) पतधोरण जाहीर केले असून सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती दिली. तसेच मोबाईल वापरकर्त्यांसाठी RBI कडून UPI आधारित पेमेंट व्यवस्था लॉन्च करण्यासाठी तयारी केली जात असल्याची गव्हर्नर शशीकांत दास (shashikant das) यांनी माहिती दिली .

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) UPI आधारित पेमेंट व्यवस्था

गुगलचे ऑनलाइन पेमेंट अॅप Google Pay वापरणाऱ्यांची भारतात मोठी संख्या आहे. याद्वारे ऑनलाइन व्यवहारासोबतच शॉपिंग, बिल पेमेंट्स देखील करता येतात. याच्या मदतीने तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता व्यवहार करू शकता. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) सुध्दा UPI आधारित पेमेंट व्यवस्था लॉन्च करण्यासाठी तयारी केली जात असल्याची गव्हर्नर शशीकांत दास यांनी माहिती दिली. आता RBI चे स्वतंत्र UPI अॅप असेल.

RBI कडून लवकरच UPI आधारित पेमेंट व्यवस्था! | Shaktikant Das
'RBI'चं पतधोरण जाहीर, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय

पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी चलनविषयक त्रैमासिक पतधोरण जाहीर केले. एमपीसीने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर (Repo Rate) 4 टक्क्यांवर कायम आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, समितीने धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.(RBI Monetary Policy)

RBI कडून लवकरच UPI आधारित पेमेंट व्यवस्था! | Shaktikant Das
Ashes AUSvsENG : कमिन्सच्या नेतृत्वातील कांगारुंनी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले

रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के (Reverse repo rate) राहील. मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बँक रेट 4.25 टक्के असेल. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरने धोरणात्मक भूमिका 'अनुकूल' ठेवली आहे. केंद्रीय बँकेने सलग 9व्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी, रिझर्व्ह बँकेने 22 मे 2020 रोजी अखेरचे व्याजदर बदलले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com