खरंच कर्ज स्वस्त होतील का?

सकाळ न्युज नेटवर्क
गुरुवार, 6 जून 2019

मागील तीन पतधोरणात पाऊण टक्क्याने रेपो दर कपात

मागील तीन पतधोरणात पाऊण टक्क्याने रेपो दर कपात

मुंबई: समाधानकारक मॉन्सूनचा अंदाज, महागाईवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिजर्व्ह बँकेने अर्थ व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याला प्राधान्य दिले आहे. त्यादृष्टीने रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने गुरूवारी (ता. 6) दुसऱ्या द्वैमासिक पतधोरणात पाव टक्क्याने व्याजदर कपात केली. पाव टक्का कपात करून समितीने रेपो दर 5.75 टक्‍क्‍यांपर्यंत कमी केला. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने वाहन आणि गृह कर्जाचे व्याजदर तुलनेने जास्तच आहेत. त्यामुळे आता बँकांची जबाबदारी वाढली असून कर्ज स्वस्ताईची अपेक्षा ग्राहक आणि उद्योजकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
  गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बाजारपेठेला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला आहे. बॅंकांनी पतधोरणाच्या तुलनेत व्याजदर कमी करून प्रतिसाद दिल्यास ग्राहकांचा कर्जाचा हप्ता कमी होण्याबरोबरच गृह आणि वाहनांसाठी कर्जाची मागणी वाढून बॅंकांच्या कर्ज मागणीतही वाढ होण्यास मदत होणार आहे. चढ्या व्याजदरांमुळे स्थावर मालमत्ता क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन वर्षात घरांची विक्रीवर परिणाम झाला असून गृह कर्जाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे. गेल्या दोन महिन्यात प्रवासी वाहने आणि मोटारींच्या विक्रीत घट झाली असून वाहन उत्पादन
कांची चिंता वाढवली आहे. सलग तिसरऱ्यांदा रेपो कपात करून आरबीआयने भूमिका पार पाडली आहे. आता पुढाकार बँकांना घ्यावा लागेल.

बँका उदासीन
 गेल्या तीन पतधोरणात रेपो दर 0.75 टक्क्यांनी कमी झाला असला तरी एसबीआय आणि इतर बड्या बँकांनी त्यांचा व्याजदर केवळ 0.15 ते 0.20 टक्क्यांनी कमी केला आहे. ठेवी दर आणि कर्ज दर यांच्यात मार्जिन कमी असल्याने बँका व्याजदर कमी करण्यात चालढकल करत असल्याचे जाणकारांचे मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI to Push Banks For Passing on Rate Cut Benefits to Consumers