esakal | येस बँकेच्या प्रश्नावर आरबीआयचा मोठा निर्णय!
sakal

बोलून बातमी शोधा

RBI reacts on YES Bank issue

आरबीआयने ३ एप्रिल २०२० पर्यंत म्हणजेच ३० दिवसांसाठी बँकेच्या कामकाजावर निर्बंध घातले आहेत. मात्र 30 दिवसांच्या आतच हा प्रश्न मार्गी लागेल असे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.  

येस बँकेच्या प्रश्नावर आरबीआयचा मोठा निर्णय!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येस बँकेला पुनर्जीवित करण्याचे धोरण अतिशय जलदगतीने राबविले जाणार असल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. तसेच अर्थव्यस्वस्थेसमोर मोठे संकट उभे राहू नये या विचाराने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरबीआयने ३ एप्रिल २०२० पर्यंत म्हणजेच ३० दिवसांसाठी बँकेच्या कामकाजावर निर्बंध घातले आहेत. मात्र 30 दिवसांच्या आतच हा प्रश्न मार्गी लागेल असे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.  

येस बँकेच्या खातेदारांना धक्का; खात्यातून ठराविक रक्कमच काढता येणार!

दरम्यान  गुरुवारी येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर सरकारी पातळीवर देखील हालचालींना वेग आला आहे. येस बँकेत संभाव्य गुंतवणूकदार म्हणून चर्चेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. बँकेतील सर्व ठेवी सुरक्षित असून खातेधारकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हणत मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सर्व ठेवीदारांना आश्वासित केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरबीआयने येस बँकेवर निर्बध घालत ठेवीदारांना बँकेतील  बचत, ठेव अथवा चालू खात्यातून केवळ 50 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच बँकेच्या संचालक मंडळाचे अधिकार गोठत प्रशासकाची नियुक्ती केली आहे. हे निर्बंध 3 एप्रिल 2020 पर्यंत लागू राहतील. निर्बंधांनंतर ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊन रात्री उशिरा पर्यंत ग्राहकांनी पैसे काढून घेण्यासाठी एटीएम बाहेर रांगा लावल्या होत्या.

loading image