esakal | येस बँकेच्या खातेदारांना धक्का; खात्यातून ठराविक रक्कमच काढता येणार!
sakal

बोलून बातमी शोधा

rbi restrictions on yes bank 50 thousand can be withdrawn

https://www.esakal.com/mumbai/maharashtra-state-budget-will-be-tabled-tomorrow-special-report-268039या कारणांसाठी रक्काम काढून शकता
- विवाह सोहळा
- शिक्षणासाठीचा खर्च 
- वैद्यकीय उपचार

येस बँकेच्या खातेदारांना धक्का; खात्यातून ठराविक रक्कमच काढता येणार!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : येस बँकेची आर्थिक पत ढासळल्यामुळं आता रिझर्व्ह बँकेनं त्यांच्यावर आर्थिक निर्बंध घातले आहेत. त्यामुळं आता खातेदारांना बँकेतून मोठी रक्कम काढता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार आता खातेदारांना केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला संमती दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं येस बँकेच्या या अडचणी येत्या काही दिवसांत दूर होतील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे. दरम्यान, काही ठराविक कारणांसाठीच ही रक्कम काढता येणार असल्यामुळं खातेदारांना किमान दिलासा मिळणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेचे निकष लागू होणार आहेत आणि रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतरच ही रक्कम काढता येणार आहे. या कारवाईपूर्वी रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्यामुळं बँकेच्या प्रशासकीय पातळीवर मोठे बदल होणार आहेत. 

आणखी वाचा - कसं असेल महाविकास आघाडीचं बजेट?

या कारणांसाठी रक्काम काढून शकता

  • विवाह सोहळा
  • शिक्षणासाठीचा खर्च 
  • वैद्यकीय उपचार

एसबीआयला 'येस'?
आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) परवानगी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. एसबीआयच्या नैत्रुत्वात इतर गुंतवणूक संस्थांच्या साह्याने येस बँकेत भागभांडवल करण्याची सरकारची योजना असल्याचे समजते. ब्लूमबर्गने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, या वृत्तानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने (बीएसई) येस बँकेला यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले असल्याचे बँकेने म्हटले आहे.

loading image