RBI Paytm App : RBI चा Paytm ला मोठा धक्का; पेमेंट एग्रीगेटरचा नाकारला अर्ज

कंपनीने 26 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारांना ही माहिती दिली आहे
Paytm
Paytmsakal

पेटीएम गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण झाली आहे. आता पेटीएमला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पेटीएमची उपकंपनी पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी अर्ज केला होता. रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठीचा अर्ज नाकारला आहे. अर्ज नाकारल्यानंतर काही काळासाठी ऑनलाइन व्यापाऱ्यांना पेटीएम प्लॅटफॉर्मशी जोडू शकणार नाही. आरबीआयने पेटीएम पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने दिलेल्या अर्जाला मंजुरी न देता पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

पेमेंट एग्रीगेटर लायसन्स म्हणजे काय?

पेमेंट एग्रीगेटर ही सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. जिथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे पेमेंट पर्याय प्रदान करू शकतो. कंपनीने 26 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारांना ही माहिती दिली आहे. या बंदीमुळे कंपनीच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही, असे कंपनीच्या वतीने शेअर बाजार एक्सचेंजला सांगितले आहे.

पेटीएमचा हा अर्ज दुसऱ्यांदा फेटाळण्यात आला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये पुन्हा अर्ज केला होता. बँकिंग नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेटीएम व्यतिरिक्त फक्त MobiKwik चे अर्ज नाकारले आहेत.

Paytm
Amazon ची ‘ही’ सेवा भारतात होणार बंद; वाचा काय आहे कारण?

रिझर्व्ह बँकेने आपला अर्ज फेटाळला नसल्याचा खुलासा पेटीएम ने केला आहे. केवळ आम्हाला १२० दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. आपण त्यानुसार आवश्यक ती सर्व कायदेशीर पावले उचलत आहोत. आम्हाला आवश्यक त्या सर्व परवानग्या लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे, असेही पेटीएम च्या प्रवक्त्याने म्हटले आहे.आम्ही ऑफलाइन व्यापाऱ्यांना प्लॅटफॉर्मशी जोडणे सुरू ठेवू. सध्याच्या ऑनलाइन व्यापाऱ्यांसोबत कंपनीचा सध्याचा व्यवसायही सुरू राहील. कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर विद्यमान ऑनलाइन व्यापाऱ्यांसोबत व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com