गुंतवणुकदारांसाठी पीएम मोदींचे गिफ्ट; RBI च्या दोन योजना लाँच|RBI | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंतवणुकदारांना PM मोदींचे गिफ्ट; RBI च्या दोन योजना लाँच

मोदी म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. आज दोन योजना लाँच करण्यात आल्या आहेत.

गुंतवणुकदारांना PM मोदींचे गिफ्ट; RBI च्या दोन योजना लाँच

रिझर्वं बँक देशाच्या अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. आरबीआय खातेदारांच्या अडचणी लगेच सोडवेलअसं मोदींनी दोन योजनांचा शुभारंभ करताना सांगितलं. बँकेसंदर्भातील अडचणी दूर होतील असंही मोदी यावेळी म्हणाले.

गेल्या सात वर्षात सर्वसामान्य लोकांच्या हितांना प्राधान्य देऊन काम करत आहे. एक रेग्युलेटर म्हणून रिझर्व्ह बँक इतर आर्थिक संस्थांसोबत सातत्याने संवाद साधते. मला आनंद होतो की आरबीआयने सर्वसामान्यांच्या सुविधांसाठी आणि त्यांना लक्षात ठेवून अनेक पावले उचलली आहेत अशा शब्दांत मोदींनी रिझर्व्ह बँकेचे कौतुक केले.

रिझर्व बँकेच्या रिटेल डायरेक्ट स्किम आणि एकात्मिक लोकपाल योजनेचा शुभारंभ मोदींनी केला. यामुळे आता गुंतवणुक करणं सहज होईल आणि तसंच गुंतवणुकदारांसाठी सुरक्षित असेल असा विश्वास मोदींनी या योजनांच्या शुभारंभावेळी केला.

हेही वाचा: भारतीय कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; लँसेंटचा रिपोर्ट

मोदी म्हणाले की, रिझर्व्ह बँकेने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. आज दोन योजना लाँच करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात गुंतवणुकीचा परीघ वाढेल तसंच गुंतवणुकदारांसाठी सोपं आणि सुरक्षित होणार असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं.

loading image
go to top