Covid-19 : भारतीय कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; लँसेंटचा रिपोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची आकडेवारी समोर आली आहे.

भारतीय कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; लँसेंटचा रिपोर्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात वेगाने लसीकरण मोहिम सुरु आहे. सध्या देशात कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचा डोस देण्यात येतो. नुकतंच कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. त्यातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी कोव्हॅक्सिनबाबत समोर येत आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची आकडेवारी समोर आली आहे.

द लँसेटने याबाबत माहिती दिली असून त्यात म्हटलं आहे की, कोव्हॅक्सिन लस कोरोनाचा वेगाने संसर्ग पसरवणारा डेल्टा व्हेरिअंटला रोखण्याची क्षमता ६५.२ टक्के इतकी आहे. जगभरात कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट चिंतेचा विषय़ बनला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्यामागे डेल्टा व्हेरिअंट असल्याचं मानलं जात आहे.

लँसेटने म्हटलं आहे की, लक्षणं असलेल्या रुग्णांना वाचवण्यात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ७७.८ टक्के प्रभावी ठरली. तर कोरोनाच्या गंभीर रुग्णांना वाचवण्यात ही लस ९३.४ टक्के तर लक्षणं नसलेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी ६३.६ टक्के इतकी प्रभावी ठरली आहे.

हेही वाचा: काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

गंभीर एईएफआय प्रकरणे म्हणजेच लस घेतल्यानंतर प्रतिकूल परिणाम झाल्याची गंभीर प्रकरणे ०.५ टक्क्यांहून कमी आहेत. तर सार्स कोविड २ व्हायरसच्या सर्व व्हेरिअंटपासून ही लस ७०.८ टक्के सुरक्षा पुरवते. कोव्हॅक्सिन लस ही भारत बायोटेक आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केली आहे.

डेल्टा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाने लशीच्या संदर्भात कोणतीही चिंता व्यक्त केली नाही असेही लँसेंटने म्हटले आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये प्रभाव आणि सुरक्षा या दृष्टीने करण्यात आलेल्या अभ्यासात भारतातील २५ ठिकाणच्या २५ हजार ८०० जणांचा समावेश होता.

loading image
go to top