'एसबीआय'चे अध्यक्ष रजनीश कुमार आरबीआयच्या पतधोरणावर काय म्हणाले?

टीम ईसकाळ
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

आरबीआयने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पावले उचलली आहेत

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेचा रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉईंटने कपात करण्याचा निर्णय दाखवून देतो की पतधोरण हे बाजाराला अनपेक्षित धक्के देऊन अधिक सक्षमपणे राबवता येते. आरबीआयने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पावले उचलली आहेत. त्याचबरोबर एनईएफटी सेवा 24 तास सातही दिवस दिल्यामुळे डिजिटल ट्रॅन्झॅक्शनचा आणखी विस्तार होण्यास मदत होणार आहे.

 ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जातील रिक्स वेटेज कमी केल्याने बॅंकांना आपले भांडवल अधिक उत्पादकपणे बाजारात आणता येणार आहे. त्याचबरोबर बॅंकांना एनबीएफसीना पतपुरवठा करण्याची परवानगी दिल्यामुळे खासगी क्षेत्रातील क्रेडिट पुरवठा वाढणार आहे. याचबरोबर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने रेपो रेटमधील आणि एमसीएलआरमधील कपात 10 ऑगस्टपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBIs unconventional rate cut to support growth

टॅग्स