तुम्ही हर्षद मेहताच्या काळातील तेजी अनुभवायला तयार आहात का ?

तुम्ही हर्षद मेहताच्या काळातील तेजी अनुभवायला तयार आहात का ?
Summary

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शेअर बाजार एका रेंजमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळाला. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा तेजी होताना दिसतेय.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर उद्योगधंद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अशातही शेअर मार्केटमधील तेजी कायम आहे. पुढील दोन महिन्यामध्ये स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सच्या किमती दुप्पट होण्याचा अंदाज तज्ज्ञ लावतायत. या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात शेअर बाजार एका रेंजमध्ये ट्रेड करताना पाहायला मिळाला. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये आता पुन्हा एकदा तेजी होताना दिसतेय. निफ्टी इंडेक्सवर मोठा वाटा असणाऱ्या रिलायन्समध्ये देखील पुन्हा एकदा तेजीचे वातावरण पाहायला मिळतेय. अशात निफ्टी पुन्हा एकदा उच्चांकांवर उच्चांक गाठतोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे होणाऱ्या नुकसानीची चिंता कुठेतरी मागे राहिल्याचं चित्र सध्या भारतीय शेअर बाजारात आहे.

तुम्ही हर्षद मेहताच्या काळातील तेजी अनुभवायला तयार आहात का ?
मादा पांडा गर्भवती, शेअर मार्केटमध्ये तेजी; कसं काय?

शेअर बाजाराचा फुगा फुटणार ?

शेअर बाजारात तेजीचा फुगवटा तयार होतोय, या आशयाच्या शंका अनेकदा उपस्थित केल्या गेल्या आहेत. मात्र अशातही शेअर मार्केट प्रत्येक नकारात्मक भावनेकडे कानाडोळा करत आणि लहानात लहान सकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित करत तेजी करत असल्याचं पाहायला मिळतंय. शेअर बाजारात लिक्विडीटी असल्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळतेय. टेकनॉलॉजि, फायनान्शियल सेक्टरसोबतच आता हाऊसिंग फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चर तसेच केमिकल सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळतेय. येत्या काळात शेअर बाजारात मंदी जरी पाहायला मिळाली, तरीही त्याचा कालावधी फार जास्त दिवसांचा असणार नाही असंही काही जाणकार सांगतायत. पुढील दोन महिन्यात अनेक स्मॉल आणि मिड कॅप शेअर्ससोबत काही लार्ज कॅप शेअरच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुम्ही हर्षद मेहताच्या काळातील तेजी अनुभवायला तयार आहात का ?
लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवा,मगच देतो विमा! कंपन्यांनी का बदलले नियम?

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात हेच वातावरण पाहायला मिळतंय. अमेरिकेतही गेल्या काही महिन्यात लिस्टेड कंपनी AMC एंटरटेनमेंट आणि गेमस्टॉप या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना भरभक्कम परतावा दिला आहे. भारतीय शेअर बाजारात देखील असंच चित्र PNB हाऊसिंग फायनान्स (PNB Housing Finance) कंपनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अवघ्या काही दिवसात PNB हाऊसिंग फायनान्सचा शेअर दुप्पट झाला.

मोठ्या तेजीची सुरवात

येत्या काळात शेअर बाजार अधिक जास्त वेगाने तेजी दाखवेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. मनी कंट्रोल या शेअर बाजाराचा अभ्यास करणाऱ्या माध्यमाने येत्या काही महिन्यात निफ्टी २० हजारांचा पल्ला गाठेल असं लक्ष्य दिलं आहे. सध्याची शेअर बाजाराची तेजी पाहता हे लक्ष्य पार करून शेअर बाजार अधिक पुढे देखील मुसंडी मारू शकतो असंही ते सांगतात.

तुम्ही हर्षद मेहताच्या काळातील तेजी अनुभवायला तयार आहात का ?
सहा महिन्यात १ लाखाचे केलेत तब्बल ६ लाख; २०२१ मधील तुफान पैसा कमावून देणारे शेअर्स

हर्षद मेहतासोबत जोडला गेलाय तेजीचा इतिहास

१९९२ मध्ये हर्षद मेहताच्या काळात वर्षाचा सुरवातीला मंदी आलेली. मात्र त्यानंतर भारतीय शेअर बाजार सुसाट तेजी करताना पाहायला मिळाला होता. या तेजीत अनेक शेअर्सच्या किंमती चांगल्याच वाढलेल्या पाहायला मिळाल्या होत्या.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com