लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवा,मगच देतो विमा! कंपन्यांनी का बदलले नियम?

insurance policy
insurance policy
Summary

टर्म इंश्युरन्स घेणं आधीपेक्षा जरा कठीण होणार आहे. याला कारण ठरलाय कोरोना.

येत्या काळात तुम्ही तुमच्या परिवाराच्या आर्थिक सुरक्षेसाठी स्वतःचा टर्म इंश्युरन्स (Term Insurance Plan) उतरवण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आता टर्म इंश्युरन्स घेणं आधीपेक्षा जरा कठीण होणार आहे. याला कारण ठरलाय कोरोना.

भारतातील काही जीवन विमा उतरावणाऱ्या कंपन्यांनी (Life insurance companies)आता टर्म इंश्युरन्ससाठीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर इंश्युरन्स कंपन्यांकडे येणाऱ्या क्लेम्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. म्हणूनच कंपन्यांनी रिस्क मॅनेजमेंट म्हणून आता काही नियम अधिक कठोर करण्याचं ठरवलं आहे.

insurance policy
सहा महिन्यात १ लाखाचे केलेत तब्बल ६ लाख; २०२१ मधील तुफान पैसा कमावून देणारे शेअर्स

जीवन विमा कंपन्यांच्या नव्या निवमान्वये आता होम क्वारंटाईनच्या माध्यमातूनही तुम्ही जर कोरोना निगेटिव्ह झाला असाल तरीही पुढील तीन महिने तुम्ही टर्म इंश्युरन्स घेऊ शकत नाहीत. अशातच आता टेली मेडिकलच्या व्यतिरिक्त विमा कंपन्या प्रत्यक्षात मेडिकल टेस्ट करून मगच टर्म इंश्युरन्स देण्यावर भर देत आहेत.

विमा कंपन्या 'क्लेम'च्या बोज्याखाली

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये क्लेमच्या केसेस वाढल्याचं पाहायला मिळालं. म्हणूनच कंपन्यांनी रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी आपले काही नियम बदलण्याचं ठरवलं आहे. विमा कंपन्यांनी टर्म इंश्युरन्स पोर्टफोलिओची रिस्क वाढवली आहे. काही कंपन्यांनी तर टर्म इंश्युरन्ससाठी आता कोरोना लसीची अट ठेवली आहे. म्हणजे लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवा आणि मगाच टर्म इंश्युरन्स घ्या,असं कंपन्या म्हणतायत. तर इतर काही कंपन्या टर्म इंश्युरन्ससाठी येत्या काळात लसीकरण अनिवार्य करू शकतात.

insurance policy
मादा पांडा गर्भवती, शेअर मार्केटमध्ये तेजी; कसं काय?

टर्म इंश्युरन्स प्लॅन एका मर्यादित कालावधीमध्ये पूर्व निर्धारित प्रीमियमवर कव्हरेज देत असतात. जर पॉलिसीच्या मुदतीत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर डेथ बेनिफिट म्हणून पॉलिसीधारकाच्या नॉमिनीला पॉलिसीचे पैसे मिळतात. टर्म इंश्युरन्स म्हणजे कोणतीही गुंतवणूक नव्हे. टर्म इंश्युरन्सचा फायदा पॉलिसीधारकाच्या कुटुंबियांना होतो. कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी (Financial Security of Family)ही पॉलिसी काढली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com