रिलायन्सकडून राईट्स इश्यूची तारीख जाहीर

वृत्तसंस्था
Monday, 11 May 2020

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बहुप्रतीक्षित राईट्स इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली असून १४ मार्च रोजी हा राईट्स इश्यू गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बहुप्रतीक्षित राईट्स इश्यूची रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली असून १४ मार्चरोजी हा  रेकॉर्ड डेट  आहे. तब्बल ५३,१२५ कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीसाठी हा इश्यू बाजारात आणला जात आहे. याअंतर्गत रिलायन्सच्या विद्यमान गुंतवणूकदारांना १५ शेअरमागे एक शेअर या प्रमाणात १२५७ रुपयांना शेअर खरेदी करता येणार आहे. दरम्यान सोमवारी शेअर बाजाराचे कामकाज संपले तेंव्हा कंपनीचा शेअर १५७५ रुपयांवर व्यवहार करून बंद झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कंपनीने ३० एप्रिलरोजी रोजी राईट्स इश्यूची घोषणा केली होती. त्यानुसार १२५७ रुपयांना गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करता येणार आहे. इश्यूची घोषणा झाल्यानंतर कंपनीचा शेअर १४६० रुपयांवरून सोमवारी १६१५ रुपयांच्या उच्चांकीवर जाऊन १५७५ रुपयांवर स्थिरावला आहे. 

महत्वाचे म्हणजे, इश्यूची घोषणा झाल्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अमेरिकेच्या सिल्व्हर लेक कंपनीने तब्बल ५हजार ६०० कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. तर व्हिस्टा इक्विटी पार्टनरने ११ हजार ३६७ कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर मोठ्या प्रमाणात वधारला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे - क्लिक करा

राईट्स इश्यू म्हणजे काय?
शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांसाठी भांडवल उभारणी करण्यासाठी इक्विटी आणि डेट प्रकारातील साधने उपलब्ध असतात. राईट्स इश्यू हा इक्विटी प्रकारातील एक पर्याय आहे. राईट्स इश्यू प्रक्रियेत फक्त विद्यमान शेअरधारकांनाच कंपनीचे नवीन शेअर खरेदी करण्याची संधी दिली जाते. या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना नवीन शेअर खरेदी करताना बाजारात शेअर व्यवहार करत असलेल्या किंमतीत सवलत (डिस्काउंट) दिली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवीन शेअर १२५७ रुपयांना मिळणार आहे.

राईट्स इश्यू आणण्यामागचे नेमके कारण काय?
वर नमूद केल्याप्रमाणे भांडवलाची उभारणी करण्यासाठी कंपनीने राईट्स इश्यू आणला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मार्च २०२१ पर्यंत कंपनीला 'नेट डेट फ्री / कर्जमुक्त' बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार भांडवल उभारणी करण्यासाठी कंपनी वेगवेगळ्या योजना आखत आहे. नुकताच फेसबुक आणि जिओ दरम्यान झालेला करार हा त्याचाच एक भाग होता. फेसबुक - जिओ कराराच्या माध्यमातून कंपनीने ४३,५७४ कोटी रूपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे, तर आता राईट्स इश्यूच्या माध्यमातून ५३,१२५ कोटी रूपयांचे भांडवल उभारले जाणार आहे. चालू स्थितीत कंपनीवर १.६१ लाख कोटी रूपयांचे निव्वळ कर्ज आहे. त्यामुळे हे कर्ज संपविण्याच्या दृष्टीने रिलायन्स वेगाने पावले उचलत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recod date for Reliance rights issue declared