‘आरकॉम’च्या संचालकांचे अधिकार बरखास्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मे 2019

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार रद्द केल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला बुधवारी दिली. दिवाळखोरी प्रकरणाचा पत्रव्यवहार हा ‘इंटरिम रिजोल्युशन प्रोफेशनल्स’कडे करावा, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.

मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनमधील संचालक मंडळाचे अधिकार रद्द केल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला बुधवारी दिली. दिवाळखोरी प्रकरणाचा पत्रव्यवहार हा ‘इंटरिम रिजोल्युशन प्रोफेशनल्स’कडे करावा, अशी माहितीही कंपनीने दिली आहे. 

रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात नुकतीच बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरी प्रक्रियेसाठी याचिका दाखल केली आहे. त्यानंतर बुधवारी रिलायन्स कम्युनिकेशनने मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला पत्र देऊन संचालक मंडळाचे अधिकार रद्द केल्याची माहिती दिली. कंपनीने दिवाळखोरीसंदर्भातील पत्रव्यवहार आणि निर्णयाचे अधिकार इंटरिम रिजोल्युशन प्रोफेशनल्सला दिले आहेत. ‘आरकॉम’ने ३१ बॅंकांचे सुमारे ५० हजार कोटी थकवले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Communication Director Right Dismiss