esakal | वूमन कनेक्ट चॅलेंज इंडियाची रिलायन्स फाउंडेशनतर्फे घोषणा | Reliance
sakal

बोलून बातमी शोधा

nita ambani

वूमन कनेक्ट चॅलेंज इंडियाची रिलायन्स फाउंडेशनतर्फे घोषणा

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : रिलायन्स फाउंडेशन (reliance) आणि यु. एस. एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट तर्फे वूमन कनेक्ट चॅलेंज इंडिया’मार्फत भारतातील दहा संघटनांची (Indian organization) अनुदानाकरिता निवड करण्यात आली आहे. त्यांना महिला सबलीकरण (Woman empowerment) तंत्रज्ञानासाठी निधी दिला जाईल.

हेही वाचा: माथेरान मधील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू; शिक्षक पालक सभेत निर्णय

लिंगभेद दूर करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासाठी रिलायन्स फाउंडेशनने साडेआठ कोटींचे अनुदान नाविन्यपूर्ण पर्यायांसाठी मंजूर केले आहे. याचा फायदा 17 राज्यांतील तीन लाखांहून अधिक महिलांना होईल. तसेच तंत्रज्ञानाच्या साह्याने महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला चालना मिळेल.

या घोषणेबद्दल बोलताना रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्ष नीता एम अंबानी म्हणाल्या की, महिलांना जीवनाच्या सर्वच अंगांनी सक्षम आणि त्यांचे सबलीकरण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. स्त्री पुरुष असमानता हद्दपार करण्यासाठी या उपक्रमाद्वारे प्रयत्न केला जाईल. यासाठीच तंत्रज्ञान हे शक्तिशाली साधन वापरले जाईल.

या दहा अनुदान-प्राप्तकर्त्यांमध्ये अनुदीप फाउंडेशन, बेअरफूट कॉलेज इंटरनॅशनल, सेंटर फॉर युथ अँड सोशल डेव्हलपमेंट, फ्रेंड्स ऑफ विमेन्स वर्ल्ड बँकिंग, नांदी फाउंडेशन, प्रोफेशनल असिस्टन्स फॉर डेव्हलपमेंट अॅक्शन, सोसायटी फॉर डेव्हलपमेंट अल्टरनेटीव्हज, सॉलीडरीदाद रिजनल एक्स्पर्टीज सेंटर, टीएनएस इंडिया फाउंडेशन आणि झेडएमक्यू डेव्हलपमेंटचा समावेश आहे. या माध्यमातून उपलब्ध पर्यायांतून महिला शेतकरी, उद्योजिका, बचत गटाच्या सदस्यांना साह्य मिळेल. या उपक्रमासाठी निवडलेल्या दहा संघटनांना 12 ते 15 महिन्यांच्या कालावधीकरिता 75 लाख ते 1 कोटी रुपये अनुदान मिळेल.

loading image
go to top