esakal | माथेरान मधील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू; शिक्षक पालक सभेत निर्णय | Matheran
sakal

बोलून बातमी शोधा

School

माथेरान मधील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू; शिक्षक पालक सभेत निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माथेरान : कोविड-19 चा प्रादुर्भाव (corona infection) टाळण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्याच्या शाळा बंद (school closed) ठेवल्या होत्या त्या शाळा 4 ऑक्टोबरला सुरू होत असताना माथेरानच्या शाळाही 4 ऑक्टोबरला सुरू (matheran school starts) होणार आहे. हा निर्णय शिक्षक-पालक सभेत (teachers-parents) एकमताने घेण्यात आला.

हेही वाचा: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भटके विमुक्तांची मते निर्णायक - नरेंद्र पवार

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने शाळा बंदचा निर्णय घेतला.त्यामध्ये माथेरान मधील प्राचार्य शांताराम गव्हाणकर विद्या मंदिर ही शाळा 6 एप्रिल पासून बंद झाली.त्यानंतर ऑनलाइन शिक्षण पद्धतीने विध्यार्थ्यांना शिक्षण मिळू लागले.पण सर्वच विध्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत नव्हते.तसेच नेटवर्क,वीज याच्या समस्या यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडाला होता.पण हळूहळू कोविडचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे शासनांने नियमाचे पालन करून शाळा सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखवल्याने शाळा 4 ऑक्टोबर पासून नियमित सुरू होणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर येथील प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्या मंदिर शाळेने शालेय वर्ष सुरू करण्यासंदर्भात पालकांची सभा शाळेच्या वर्गात आयोजित केली होती.यावेळेस पालकांनी घ्यावयाची खबरदारी याबाबत सूचित करण्यात आले.शाळा ही घड्याळी तीन तास व शालेय तासिकेनुसार चार तास चालेल यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करणे,यावर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा: BMC : तीन सदस्यीय प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी विध्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासंबंधी पालकांनी व विध्यार्थ्यांना काय काळजी घ्यावयाची या विषयी मार्गदर्शन केले.तर ऑनलाइन शिक्षणात विध्यार्थी मन लावून शिक्षण घेत नाहीत यावर शिक्षक रमेश ढोले यांनी नाराजी प्रकट केली तर नगरपालिकेच्या शिक्षण सभापती प्रतिभा घावरे यांनी शाळेसाठी नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल,दोन दिवसात सर्व वर्ग सॅनिटाईज करून देणार अशी ग्वाही दिली.
या प्रसंगी सर्व पालकांच्या एकमताने शाळा सुरू करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला.यावेळी नगरसेवक चंद्रकांत जाधव,संघपाल वाठोरे तसेच पालक आणि शिक्षक वृंद उपस्थित होता.

घ्यावयाची काळजी

1) विध्यार्थ्यांने गणवेश रोज बदलणे
2) शाळेत येताना मास्क लावणे अनिवार्य
3) प्रत्येक विद्यार्थ्यांकडे सॅनिटाईझर असणे आवश्यक
4) शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य
5) वॉटर बॅग आणणे अनिवार्य
6) मधल्या सुट्ट्या रद्द
7) एखाद्या मुलाला सर्दी जरी झाली असेल त्यास शाळेत पाठवू नये.
8) प्रत्येक बाकावर एक विध्यार्थी आसन व्यवस्था असेल.

loading image
go to top