esakal | रिलायन्सचा राईट्स इश्यू झाला खुला  
sakal

बोलून बातमी शोधा

reliance

रिलायन्स इंडस्ट्रीजचा बहुप्रतीक्षित राईट्स इश्यू आज(२०मे)गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे.२०मे ते३जून  कालावधीत विद्यमान शेअरधारकांना राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार आहे

रिलायन्सचा राईट्स इश्यू झाला खुला  

sakal_logo
By
वृत्तसंस्था

रिलायन्स इंडस्ट्रीजचा बहुप्रतीक्षित राईट्स इश्यू आज (२० मे) गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. २० मे ते ३ जून या कालावधीत विद्यमान शेअरधारकांना राईट्स इश्यूमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. १४ मे पर्यंत ज्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स कंपनीचे शेअर खरेदी केले आहेत अशा विद्यमान गुंतवणूकदारांना १५ शेअरमागे एक शेअर या प्रमाणात १२५७ रुपयांना नवीन शेअर खरेदी करता येणार आहे. यापैकी २५ टक्के रक्कम म्हणजेच ३१४.२५ रुपये प्रति शेअर्सनुसार गुंतवणुकदारांना भरावे लागतील. तर उर्वरित ९४२.७५ रुपयांची रक्कम दोन टप्प्यांत द्यावी लागेल. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ टक्के रक्कम म्हणजेच ३१४.२५ रुपये पुढील वर्षी मे २०२१ मध्ये भरावे लागतील आणि इतर ५० टक्के रक्कम ६२८.५० रुपये नोव्हेंबर २०२१ मध्ये भरावे लागतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिलायन्सने ५३,१२५ कोटी रुपयांच्या भांडवल उभारणीसाठी हा इश्यू बाजारात आणला आहे.

* रिलायन्स इंडस्ट्रीजचा बहुप्रतीक्षित राईट्स इश्यू आज (२० मे) गुंतवणूकदारांसाठी खुला 
* विद्यमान गुंतवणूकदारांना १५ शेअरमागे एक शेअर या प्रमाणात १२५७ रुपयांना नवीन शेअर खरेदी करता येणार
* २५ टक्के रक्कम म्हणजेच ३१४.२५ रुपये प्रति शेअर्सनुसार गुंतवणुकदारांना भरावे लागतील
* उर्वरित ९४२.७५ रुपयांची रक्कम दोन टप्प्यांत द्यावी लागेल
* राईट्स इश्यूच्या माध्यमातून रिलायन्स उभारणार ५३,१२५ कोटी रुपये

कंपनीने ३० एप्रिल रोजी रोजी राईट्स इश्यूची घोषणा केली होती. त्यानुसार १२५७ रुपयांना गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करता येणार आहे. इश्यूची घोषणा झाल्यानंतर कंपनीच्या शेअरने १४६० रुपयांवरून १६१५ रुपयांच्या उच्चांकीची नोंद केली आहे. मात्र शेअर बाजारात पडझड झाल्यानंतर शुक्रवारी कंपनीचा शेअर १४५३.२० वर बंद झाला. महत्वाचे म्हणजे, इश्यूची घोषणा झाल्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अमेरिकेच्या सिल्व्हर लेक कंपनीने तब्बल ५ हजार ६०० कोटींच्या गुंतवणुकीची करार केला आहे. व्हिस्टा इक्विटी पार्टनरने ११ हजार ३६७ कोटींच्या गुंतवणुकीचा करारा केला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राईट्स इश्यू काय असतो?
शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांसाठी भांडवल उभारणी करण्यासाठी इक्विटी आणि डेट प्रकारातील साधने उपलब्ध असतात. राईट्स इश्यू हा इक्विटी प्रकारातील एक पर्याय आहे. राईट्स इश्यू प्रक्रियेत फक्त विद्यमान शेअरधारकांनाच कंपनीचे नवीन शेअर खरेदी करण्याची संधी दिली जाते. या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना नवीन शेअर खरेदी करताना बाजारात शेअर व्यवहार करत असलेल्या किंमतीत सवलत (डिस्काउंट) दिली जाते. रिलायन्सचा नवीन शेअर १२५७ रुपयांना मिळणार आहे.

कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ''या''  टिप्स घ्या लक्षात

रिलायन्सने का आणला आहे राईट्स इश्यू ?
वर स्पष्ट केल्याप्रमाणे भांडवलाची उभारणी करण्यासाठी रिलायन्सने राईट्स इश्यू आणला आहे. रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी मार्च २०२१ पर्यंत कंपनीला 'कर्जमुक्त' बनविण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवल उभारणी करते आहे. अलीकडेच फेसबुक आणि जिओ दरम्यान झालेला करार हा त्याचाच एक भाग होता. फेसबुक - जिओ भागीदारीद्वारे कंपनीने ४३,५७४ कोटी रूपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे, तर आता राईट्स इश्यूच्या माध्यमातून ५३,१२५ कोटी रूपयांचे भांडवल उभारले जाणार आहे. याशिवाय रिलायन्सने जिओद्वारे इतरही मोठी गुंतवणूक आकर्षित केली आहे. काही करार यासाठी झाले आहेत. चालू स्थितीत कंपनीवर १.६१ लाख कोटी रूपयांचे निव्वळ कर्ज आहे. कर्जमुक्त होण्यासाठी रिलायन्स वेगाने पावले उचलत आहे.