व्हायब्रंट गुजरात: अंबानी करणार 3 लाख कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

गांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात वेगवेगळ्या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये रिलायन्स 3 लाख कोटी रुपये गुंतवणार आहे. ऊर्जा आणि पेट्रोकेमिकलपासून नव्या डिजीटल व्यवसायासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये रिलायन्स ही गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमधील जामनगर येथे जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा रिफायनरी चालवते. त्याचबरोबर गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रिलायन्सचे पेट्रोकेमिकल प्रकल्पदेखील आहेत. 

'गुजरात आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. गुजरात नेहमीच आमची पहिली पसंती असणार आहे', असे मत मुकेश अंबानींनी 9 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये व्यक्त केले आहे. रिलायन्सने जिओच्या रुपाने टेलिकॉम क्षेत्रात अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. आताप्रयत रिलायन्सने गुजरातमध्ये 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. पुढील दहा वर्षात गुंतवणूक वाढवत रिलायन्स गुजरातमध्ये मोठी रोजगार निर्मितीही करणार आहे. जिओचे 5 जी नेटवर्कही पूर्णपणे तयार असल्याचे अंबानींनी सांगितले. 

जग ईलेक्ट्रीक वाहनांकडे वळत असताना जामनगर येथील रिलायन्स फक्त इंधन निर्मितीवर लक्ष केंद्रित करणार नसून यापुढील काळात पेट्रोकेमिकलवर अधिकाधिक लक्ष देण्यात येणार असल्याचेही अंबानींनी पुढे सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Industries Io Invest Rs. 3 Lakh Crore In Gujarat In 10 Years