मुकेश अंबानींच्या रिलायन्सला 10 हजार 104 कोटींचा नफा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

मुंबई: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला जूनअखेर सरलेल्या तिमाहीत 10,104 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जूनअखेर सरलेल्या तिमाहीत रिलायन्सच्या नफ्यात 6.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. नफ्यातील वाढ मुख्यत: टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायातून झालेली आहे. रिलायन्स जिओच्या नफ्यात 45.60 टक्के वाढ झाली आहे. जिओने 891 कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली आहे. जिओचे एकूण 33.13 कोटी ग्राहक आहेत.

रिलायन्स रिटेलच्या नफ्यात 47.5 टक्क्यांची वाढ होत नफा 38,196 कोटी रुपयांवर पोचला आहे. रिलायन्सचा एकूण महसूल 21.25 टक्क्यांनी वाढून 1 लाख 61 हजार कोटी कोटी रुपयांवर पोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत रिलायन्सचा महसूल 1 लाख 33 हजार कोटी रुपये होता. रिलायन्सचे अर्निंग पर शेअर 17.1 रुपये इतके आहे. 

आज दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 12.80 रुपयांनी म्हणजेच 1.01 टक्क्यांनी घसरून 1249 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 7 लाख 91 हजार 750.71 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Industries profit rises 6.8% in June quarter