रिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली.

गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सची सर्वात मोठी रिफायनरी आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला प्रति बॅरल खनिज तेल शुद्धीकरणातून 8.8 डॉलरचे मार्जिन मिळाले. नफ्यात आणि एकूण महसुलात चांगली वाढ झाली. कंपनीला 1 लाख 8 हजार 561 कोटींचा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत नफ्यात 37.7 टक्‍क्‍यांची वाढ झाली. 

'जिओ'ला नफा 
कंपनीने इंधनातून केलेल्या कमाई बरोबरच मोफत दूरसंचार सेवा देणाऱ्या 'जिओ'चा नफा 64.9 टक्क्यांनी वाढत 831 कोटींवर पोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत तो 504 कोटी रुपये होता. सलग पाचव्या तिमाहीत जिओने नफा नोंदवला आहे. 

आज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1133.75 रुपयांवर व्यवहार करत किरकोळ घसरणीसह बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.718,643.47 कोटींचे बाजारभांडवल आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance Industries Profit At Rs 10,251 Crore In Q3