esakal | रिलायन्सची राईट मूव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

रिलायन्सची राईट मूव्ह 

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतीच 'राईट्‌स इश्‍यू'ची घोषणा केली आहे. रिलायन्सचा हा पहिलाच 'राईट्‌स इश्‍यू' असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

रिलायन्सची राईट मूव्ह 

sakal_logo
By
अतुल सुळे

देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतीच 'राईट्‌स इश्‍यू'ची घोषणा केली आहे. रिलायन्सचा हा पहिलाच 'राईट्‌स इश्‍यू' असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कंपनीने 53 हजार 125 कोटी रुपयांच्या जंबो 'राईट्‌स इश्‍यू'ची घोषणा केली आहे. प्रत्येक 15 शेअरवर एक शेअर 1257 रुपये प्रमाणे मिळणार आहे. ज्या दिवशी (30 एप्रिल) कंपनीने 'राईट्‌स इश्‍यू'ची घोषणा केली त्यादिवशीच्या कंपनीच्या शेअरच्या भावाचा विचार केल्यास हा भाव 14 टक्के कमी आहे. रेकॉर्ड डेट लवकर जाहीर करण्यात येणार आहे. शेअरने 1617 रुपयांची वर्षभरातील उच्चांकी तर 876 रुपयांची नीचांकी पातळी गाठली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'राईट्‌स इश्‍यू' कसा आहे हे जाणून घेण्यासाठी काही ठळक मुद्द्यांचा विचार करावा लागेल. 

1)कंपनीचे अध्यक्ष आणि प्रवर्तक मुकेश अंबानी यांनी मार्च 2021 पर्यंत कंपनी 'झिरो नेट डेट' असेल असे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. म्हणजेच कंपनीचे कॅश व कॅश इक्विव्हॅलंट असेट्‌स' कर्जापेक्षा अधिक असतील. 'राईट्‌स इश्‍यू' हे त्या दिशेने उचललेले पाऊल आहे. 

2)कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा 50 टक्के आहे. ते या 'राईट्‌स इश्‍यू'त भाग घेणार आहेत. तसेच पब्लिक इश्‍यूचा हिस्सा शिल्लक राहिल्यास तो पण खरेदी करणार आहेत. 

3) सुरुवातीला 25 टक्के रक्कमच भरायची असून कंपनीनंतर कॉल करेल तेव्हा उर्वरित रक्कम भरायची आहे. 

4) कंपनीच्या 'ऑईल टू केमिकल' व्यवसायातील 20 टक्के हिस्सेदारी सौदीच्या अरॅमको कंपनीला विकून 1 लाख कोटी रुपये उभे करण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू आहे. 

5) कंपनीने 'जिओ प्लॅंटफॉर्म'मधील 10 टक्के हिस्सा 'फेसबुक'ला विकून 43 हजार 574 कोटी रुपये उभे केले आहेत. 

6) कंपनी मोठे करार करून लवकरच 'झिरो नेट डेट' होऊ शकते. यामुळे कंपनीचा व्याजाचा खर्च खूपच कमी होऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

7) कंपनीच्या मार्च 2020 तिमाहीतील कामगिरीचा विचार केल्यास, गेल्या वर्षाच्या तुलनेत नफा 37 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. कारण, जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीतील मोठी घसरण झाली आहे. 

8) कंपनीच्या विविध विभागांचा विचार केल्यास गेल्यावर्षीच्या तुलनेत पेट्रोकेमिकल्सचा ऑपरेटिंग नफा 43 टक्‍क्‍यांनी घटला आहे. तर डिजिटल व्यवसायाचा ऑपरेटिंग नफा 54 टक्‍क्‍यांनी, रिटेलचा नफा 20 टक्‍क्‍यांनी आणि रिफायनिंगचा नफा 28 टक्‍क्‍यांनी वाढला आहे. 

9) कंपनीच्या पारंपारिक व्यवसायातील (पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग) भांडवली खर्च (कॅपेक्‍स) आता कमी झाल्याने कंपनी तो पैसा टेलिकॉम व रिटेल व्यवसायाच्या वाढीसाठी वापरू शकते. 

10) तज्ज्ञांच्या मते, कंपनी भविष्यकाळात टेलिकॉम व रिटेल व्यवसायातील हिस्सा विकून मुदती आधीच 'नेट डेट फ्री' होऊ शकते. 

'कोविड 19'मुळे कोसळलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि प्रदीर्घ लॉकडाऊनचा कंपनी कसा सामना करते, यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 

लेखक निवृत्त बॅंक अधिकारी आहेत. 

loading image
go to top