जिओची कोटीच्या कोटी उड्डाणे...रिलायन्सचा शेअर विक्रमी पातळीवर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये झालेल्या सहाव्या भरघोस गुंतवणूकीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज विक्रमी पातळीवर पोचला आहे. सकाळच्या सत्रात जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अबु धाबीस्थित गुंतवणूकदार कंपनी, मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा झाली आणि रिलायन्सचा शेअर 1,600 रुपये प्रति शेअरच्या विक्रमी पातळीवर पोचला होता.

जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये झालेल्या सहाव्या भरघोस गुंतवणूकीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज विक्रमी पातळीवर पोचला आहे. सकाळच्या सत्रात जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अबु धाबीस्थित गुंतवणूकदार कंपनी, मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनी 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा झाली आणि रिलायन्सचा शेअर 1,600 रुपये प्रति शेअरच्या विक्रमी पातळीवर पोचला होता. रिलायन्सच्या शेअरच्या किंमतीत जवळपास 1 टक्क्यांची वाढ झाली होती. त्यामुळे रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जिओ प्लॅटफॉर्म्सध्ये मागील सहा आठवड्यात जिओमधील ही सहावी गुंतवणूक आहे. मुबादलाच्या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सद्वारे रिलायन्सने एकूण गुंतवणूक ८७,६५५.३५ कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. जिओमध्ये जगातील आघाडीच्या तंत्रज्ञानविषयक आणि आघाडीच्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. यात फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अटलांटिक आणि केकेआर यांचा समावेश आहे. सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1593 रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे.

जिओचा आणखी एक मोठा करार; आता 'ही' कंपनी करणार गुंतवणूक

रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्च 2021 पर्यत कर्जमुक्त होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मार्चअखेर रिलायन्सवर एकूण 3.36 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे तर कंपनीकडे 1.75 लाख कोटी रुपयांची रोकड आहे. त्यामुळे रिलायन्सवरील निव्वळ कर्ज 1.61 लाख कोटी रुपये इतके होते. कर्जमुक्त होण्यासाठीच रिलायन्स इंडस्ट्रीज आपली उपकंपनी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा वापर करते आहे. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये मुकेश अंबानी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करत आहेत. यात आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग आहे. आतापर्यत सहा मोठ्या गुंतवणूकीचे करार रिलायन्सने केले आहेत.

शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance industries share at record high