esakal | दिवाळीच्या सुमारास 'जिओफोन नेक्स्ट' बाजारात; जिओ गुगलची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Jio Phone Next

दिवाळीच्या सुमारास 'जिओफोन नेक्स्ट' बाजारात; जिओ गुगलची घोषणा

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : रिलायन्सचा (Reliance) बहुचर्चित पूर्णपणे भारतीय बनावटीचा जिओफोन नेक्स्ट (jiophone next) येत्या दिवाळीच्या (diwali festival) सुमारास बाजारात येईल अशी घोषणा जिओ आणि गुगल (google) यांनी केली आहे. जिओफोन नेक्स्टच्या चाचण्या (Jio phone test) वेळापत्रकानुसार (timetable) सुरु असून लवकरच तो ग्राहकांच्या सेवेत येईल, असे जिओ प्लॅटफॉर्म ने कळविले आहे. हा देशी बनावटीचा कमी किमतीचा परवडणारा स्मार्टफोन (smartphone) जिओ व गुगल या दोघांतर्फे तयार करण्यात येत आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या आधुनिक महागड्या फोनमधील स्मार्ट कॅमेरा, गुगल असिस्टंट व अन्य वैशिष्ट्ये (smartphone specification) या जिओफोन नेक्स्ट मध्ये असतील. ग्राहकांना हा फोन आपल्या भाषेनुसार वापरता येईल.

हेही वाचा: ‘विसर्जन आपल्या दारी’ ला भाविकांचा वाढता प्रतिसाद

सध्या जगात सर्वत्र सेमिकंडक्टर या महत्वाच्या भागाचा तुटवडा असल्याने या जिओफोन नेक्स्ट च्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. मात्र दिवाळीपर्यंत सर्वकाही सुरळित होईल, असे जिओ प्लॅटफॉर्मचे म्हणणे आहे. सध्या काही निवडक वापरकर्त्यांसह या फोनच्या चाचण्या सुरु असून फोनची सर्व वैशिष्ट्ये व्यवस्थित काम करीत आहेत का हे तपासले जात आहे. त्या वैशिष्ट्यांचा एकमेकांशी मेळ बसविला जात असून दिवाळीपर्यंत हा फोन बाजारात येईल.

loading image
go to top