esakal | ‘विसर्जन आपल्या दारी’ ला भाविकांचा वाढता प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

‘विसर्जन आपल्या दारी’ ला भाविकांचा वाढता प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मालाड : कोरोनाच्या (Corona) पर्श्वभूमीवर मागील वर्षापासून महापालिका (Municipal) ‘विसर्जन आपल्या दारी’ ही संकल्पना राबवत आहे. यंदादेखील गणेश (Ganesh) भक्तांनी या संकल्पनेस उत्सफुर्त प्रतिसाद देत आपापल्या घरगुती गणेश मुर्त्या पालिकेच्या (Municipal) फिरत्या तलावांत विसर्जन केल्या.

कोरोनाच्या संकटात विसर्जनादरम्यान भाविकांची गर्दी होऊ नये तसेच, त्यांना सणही आनंदाने साजरा करता यावा, यासाठी पालिकेतर्फे ही संकल्पना राबवली जात आहे. याअंतर्गत ट्रक व मोठ्या वाहनांवर मोठ्या टाक्या लावून फिरत्या तलावांची निर्मिती पालिकेने केली आहे. ही वाहने इमारतींच्या प्रवेशद्वारांपर्यंत नेली जातात. तिथे नागरिक घरगुती मूर्त्यांचे सोयीस्करपणे विसर्जन करतात व पालिकेचे अधिकारी, कर्मचारीही त्यांना मदत करतात.

हेही वाचा: गणेश मूर्ती विक्री करणाऱ्या मित्रांवर चतुर्थी दिवशीच विघ्न!

पालिकेच्या पी / उत्तरविभागात गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे गणेशभक्तांनी उत्सफुर्तपणे या उपक्रमाला प्रतिसाद दिला, असे पालिकेचे अधिकारी संतोष दळवी यांनी सांगितले.

loading image
go to top