रिलायन्स प. बंगालमध्ये गुंतवणार १० हजार कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

कोलकाता - दूरसंचार नेटवर्क तसेच, नवीन ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून पश्‍चिम बंगालमध्ये १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, अशी घोषणा रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज केली. येथे आयोजित ‘ग्लोबल बिझनेस समिट’मध्ये ते बोलत होते. रिलायन्सने राज्यात आतापर्यंत २८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे अंबानी यांनी या वेळी स्पष्ट केले. भारत हा २०१९ मध्ये जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असून, येत्या दशकभरात तो १० ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक जीडीपी असलेला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनेल, असा विश्‍वासही अंबानी यांनी या वेळी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance West Bengal Investment 10000 Crore