रेपो दरवाढीमुळे सेन्सेक्‍स, निफ्टीमध्ये घसरण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई - शेअर बाजारातील सलग सात सत्रांतील तेजीची मालिका रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर वाढीमुळे बुधवारी खंडित झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८४ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ५२१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० अंशांची घट होऊन ११ हजार ३४६ अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्का वाढ केली आहे. ही दोन महिन्यांतील सलग दुसरी वाढ आहे. यामुळे रिझर्व्ह बॅंक इतर बॅंकांना पैसे व्याजाने देते तो रेपो दर आता ६.५ टक्‍क्‍यांवर गेला. आज सेन्सेक्‍स ३७ हजार ७११ अंश या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेला होता.

मुंबई - शेअर बाजारातील सलग सात सत्रांतील तेजीची मालिका रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर वाढीमुळे बुधवारी खंडित झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८४ अंशांची घसरण होऊन ३७ हजार ५२१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १० अंशांची घट होऊन ११ हजार ३४६ अंशांवर बंद झाला. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्का वाढ केली आहे. ही दोन महिन्यांतील सलग दुसरी वाढ आहे. यामुळे रिझर्व्ह बॅंक इतर बॅंकांना पैसे व्याजाने देते तो रेपो दर आता ६.५ टक्‍क्‍यांवर गेला. आज सेन्सेक्‍स ३७ हजार ७११ अंश या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेला होता. मात्र, पतधोरण आढावा जाहीर झाल्यानंतर त्यात घसरण सुरू झाली. अखेर कालच्या तुलनेत त्यात ८४ अंशांची घसरण होऊन तो ३७ हजार ५२१ अंशांवर बंद झाला. मागील सलग सात सत्रांत निर्देशांकात १ हजार ११० अंशांची वाढ झाली होती. 
व्याजदराच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या वाहननिर्मिती, वित्त आणि बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग आज घसरले. दरम्यान, काल (३१ जुलै) परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५७२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले; तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २९० कोटी रुपयांचे समभाग विकले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: repo rate increase sensex nifty decrease