
वर्ल्ड बँकेने 2020-21 चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांनी घसरणार असल्याची शक्यता वर्तविली आहे.
वर्ल्ड बँकेने 2020-21 चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 9.6 टक्क्यांनी घसरणार असल्याची शक्यता वर्तविली आहे. तर पुढील आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा सावरून 5.4 टक्क्यांनी वाढ नोंदविणार असल्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे. जागतिक आर्थिक प्रॉस्पेक्टच्या अहवालात जागतिक बँकेने कोरोना विषाणूच्या साथीमुळे असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असल्याचे नमूद केले आहे. कोरोनाच्या संकटामुळे असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झाल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे. तसेच वर्ल्ड बँकेने या अहवालातून कौटुंबिक स्तरावरील खर्च आणि खासगी गुंतवणूकीतील घट झाल्याचे दर्शविले आहे.
दोन सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेची कारवाई
वर्ल्ड बँकेने जाहीर केलेल्या या अहवालात भारतीय अर्थव्यवस्था अगोदरच आक्रसत असताना नेमके याच वेळी कोरोना साथीच्या रोगाने घाव घातल्याचे म्हटले आहे. व 2020-21 च्या वित्तीय वर्षातील उत्पादनातही 9.6 टक्क्यांची घट दिसून येण्याची शक्यता असल्याचे वर्ल्ड बँकेने या अहवालात म्हटले आहे. तसेच याचा कौटुंबिक उत्पन्न आणि खाजगी गुंतवणूकीत प्रभाव दिसत असल्याचे वर्ल्ड बँकेने अधोरेखित केले असून, मात्र आगामी आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर सुधारण्याचा अंदाज वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे. आणि हा विकास दार 5.4 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे अहवालात सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाची साथ येण्यापूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेला घरघर लागल्याचे वर्ल्ड बँकेच्या या अहवालाने शिक्कामोर्तब होत आहे.
फास्टटॅग डिजिटल सिस्टीम होतीय लोकप्रिय; महिन्यात वाढले 1.35 कोटी व्यवहार
याव्यतिरिक्त, असंघटित क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण 80 टक्के असून, कोरोना साथीच्या महामारीमुळे या घटकात मोडणाऱ्यांच्या उत्पन्नात घट होऊन सर्वात मोठे नुकसान झाल्याचे अहवाल वर्ल्ड बँकेने स्पष्ट केले आहे. अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला असून, कोरोनाच्या अटकावासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.