रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 7 जून 2019

मंदावलेल्या अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ६) रेपोदरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर ६ टक्‍क्‍यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकावर आला असून, यातून नजिकच्या काळात गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होतील, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे.

मुंबई - मंदावलेल्या अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ६) रेपोदरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर ६ टक्‍क्‍यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकावर आला असून, यातून नजिकच्या काळात गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होतील, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे. 

रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत पार पडली. समितीतील सर्व सदस्यांनी व्याजदर कपातीच्या बाजूने कौल दिला. 

विकासदराचा अंदाज घटवला 
रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षासाठीच्या विकासदराचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती पाहता चालू वर्षात विकासदर ७ टक्‍क्‍यांपर्यंत राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी बॅंकेने ७.२ टक्के विकासदराचा अंदाज वर्तवला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reserve bank Interest Rate Decrease