रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारभांडवलात 69 हजार कोटींची घसरण

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मे 2019

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारभांडवलात गेल्या सहा सत्रांमध्ये शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे मोठी घसरण झाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये 3 मे पासून घसरण सुरु असून आज देखील कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची घसरण सुरु झाली आहे. चालू महिन्यात कंपनीच्या  बाजारभांडवलात तब्बल 10 अब्ज डॉलरची म्हणजेत 69 हजार कोटींची घसरण झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे 7 लाख 94 हजार 772.80 कोटींचे बाजारभांडवल आहे. 

कंपनीवरील वाढता कर्जाचा बोझा आणि खनिज तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या मार्जिनमध्ये होणारी घट सध्या कंपनीच्या चिंतेचा विषय आहे. शिवाय जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत होत असलेल्या वाढीमुळे रिलायन्सच्या गॅस आणि पॉलिस्टर व्यवसायावर परिणाम होऊन गेल्या दोन वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये जी वाढ झाली आहे त्यात 'करेक्शन' येऊ शकते असे ‘मॉर्गन स्टॅन्ले' म्हटले आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 3.50 टक्क्यांच्या म्हणजेच 45.45 रुपयांच्या घसरणीसह 1254 रुपयांवर व्यवहार करत बंद झाला. शेअरने वर्षभरात 907.10 रुपयांची नीचांकी तर 1413.75 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RIL shares fall over 10% in 4 sessions, erase over $10 billion in market value