कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती

Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Todayesakal
Summary

युक्रेनच्या संकटामुळं पेट्रोलियमच्या किमतीत लक्षणीय वाढ झालीय.

आजही इंधनाच्या दरात (Petrol Diesel Price Today) कोणताही बदल झालेला नाहीय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलानं प्रति बॅरल 122 डॉलरची पातळी गाठलीय. काल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनीही युक्रेनच्या संकटामुळं पेट्रोलियमच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली असून हे महागाईचं सर्वात मोठं कारण असल्याचं सांगितलं.

यासोबतच दास यांनी चालू आर्थिक वर्षातील महागाईचा अंदाज 1 टक्क्यांनी वाढवून 6.7 टक्क्यांवर नेलाय. याशिवाय, कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 100 डॉलरवरून 105 डॉलरपर्यंत वाढलीय. दिल्लीत आज पेट्रोल 96.72 रुपये (Petrol price in Delhi) आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

Petrol Diesel Price Today
भाजपच्या बोलघेवड्या नेत्यांना बसणार लगाम; 38 नेत्यांची यादी तयार

तर, आज मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आणि डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com