सोन्यात गुंतवणुकीचा वाढता ट्रेंड, 'हे' 4 पर्याय आहेत सर्वोत्तम, तुम्हीही मिळवू शकता नफा Investment In Gold | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Rate

सोन्यात गुंतवणुकीचा वाढता ट्रेंड, 'हे' 4 पर्याय आहेत सर्वोत्तम, तुम्हीही मिळवू शकता नफा

Investment In Gold : भारत हा जगातील दुसरा देश आहे जिथे सोन्याचा वापर सर्वाधिक केला जातो. भारतातील लोकांसाठी सोने हे केवळ मौल्यवान धातू नसून त्याला परंपरेमध्ये महत्वाचे स्थान आहे.

याशिवाय गुंतवणुकीसाठी सोने हा एक उत्तम पर्याय मानला जातो. भारतातील सोन्याचे महत्त्व यावरून लक्षात येते की, लग्नसमारंभाच्या बजेटचा मोठा भाग सोन्याचे दागिने आणि नाणी इत्यादींवर खर्च केला जातो.

सोन्यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण अनेक गुंतवणूकदारांना कुठे गुंतवणुक करावी हे कळत नाही. खाली दिलेले 4 पर्याय हे सर्वोत्तम आहेत .

1. सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond)

या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्याने जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होते आणि तुम्ही चिंता न करता परतावा मिळवू शकता.

रिझर्व्ह बँक सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी करते, त्यामुळे त्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. सॉवरेन गोल्ड फंडमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. सोन्याच्या किंमतीव्यतिरिक्त, यावर 2.5% निश्चित परतावा देखील उपलब्ध आहे.

हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

2. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (Gold ETF)

शेअर्सप्रमाणे सोने खरेदी करण्याच्या सुविधेला गोल्ड ईटीएफ म्हणतात. ही म्युच्युअल फंड योजना आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याचा हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. हे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत जे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी आणि विकले जाऊ शकतात.

गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ट्रेडिंग डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. यामध्ये सोन्याची खरेदी युनिटमध्ये केली जाते. ते विकल्यावर तुम्हाला सोने नाही तर त्यावेळच्या बाजारभावाइतकी रक्कम मिळते.

3. गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Funds)

गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे गोल्ड ईटीएफपेक्षा सोपे आहे. तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडामध्ये थेट ऑनलाइन पद्धतीने किंवा त्याच्या वितरकांद्वारे गुंतवणूक करू शकता. दुसरीकडे, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे.

याशिवाय गोल्ड म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याची परवानगी देतात. गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड गुंतवणूक उत्पादने आहेत जे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड मध्ये गुंतवणूक करतात आणि त्यांचे नेट अॅसेट व्हॅल्यू (एनएव्ही) ईटीएफच्या कामगिरीशी जोडलेले असते.

हेही वाचा: Share Market Holiday 2023 : नवीन वर्षात शेअर बाजाराला असतील 'एवढ्या' सुट्ट्या; पहा यादी

4. पेमेंट अॅपद्वारेही तुम्ही सोने खरेदी करू शकता

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरूनच डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता. यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही किंमतीला सोने खरेदी करू शकता. ही सुविधा Amazon Pay, Google Pay, Paytm, PhonePe आणि Mobikwik सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.