esakal | जीएसटीवरुन सरकारची भूमिका बदलली; 'हे' होणार स्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

जीएसटीवरुन सरकारची भूमिका बदलली; 'हे' होणार स्वस्त

जीएसटीवरुन सरकारची भूमिका बदलली; 'हे' होणार स्वस्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या (वस्तू आणि सेवा कर) झालेल्या बैठकीत अनेक वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात टीव्ही संच, सिनेमाची तिकिटे आणि व्हिडिओ गेमसहीत अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. या वस्तूंना 28 टक्के कराच्या श्रेणीत 5 किंवा 12 टक्क्यांच्या श्रेणीत आणण्यात आले आहे. 28 टक्के कराच्या श्रेणीत आता फक्त 28 वस्तू आहेत. ज्यात एअर कंडिशनर, सिमेंट, पान मसाला, तंबाखूशी निगडीत उत्पादने यांचा समावेश आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.

टीव्ही, टायर, पॉवर बँक यांच्यावरील कर आता 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तर अपंगांसाठीच्या विविध वस्तूंवरील कर आता 5 टक्के करण्यात आला आहे. सिनेमाच्या तिकिटांवर आता 18 टक्क्यांऐवजी 12 टक्के करच आकारला जाणार आहे. मात्र, महसूली उत्पन्न लक्षात घेता जीएसटी कौन्सिलने सिमेंट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील सुटे भाग यांच्यावरील कर कमी केलेले नाहीत. या बैठकीत तामिळनाडूचे डी जयकुमार, दिल्लीचे मनीष सिसोदिया, प. बंगालचे अमित मित्रा, कर्नाटकचे कृष्णा बायरे गोवडा, केरळचे टी एम थॉमस, हरियाणाचे कॅप्टन अभिमन्यू आणि पंजाबचे मनप्रीत सिंग बादल हे हजर होते.

loading image